Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 7 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 10:39 AM2019-07-07T10:39:41+5:302019-07-07T10:41:41+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
कर्क प्रवाहात मुले 25 क. 47 मि. पर्यंत राहतील. पुढे सिंह राशीत मुले प्रवेश करतील. प्रगल्भता आणि प्रयत्न असे कार्यमार्ग राहतील. त्यातून अनेक प्रांतात मुले सफलता संपादन करू शकतील. संपर्क संबंध विशेष राहतील. शिक्षणात प्रगती होईल.
कर्क राशी ड, ह
सिंह राशी म, ट अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
रविवार, दि. 7 जुलै 2019
भारतीय सौर, 16 आषाढ 1941
मिती आषाढ शुद्ध पंचमी 10 क. 19 मि.
पुर्वा नक्षत्र 20 क. 13 मि. सिंह चंद्र 25 क. 47 मि.
सूर्योदय 06 क. 8 मि., सूर्यास्त 07 क. 19 मि.
दिनविशेष
1910 - भारत इतिहास संशोधक मंडळ संस्थेची स्थापना इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि खं. चिं मेहेंदळे यांनी पुणे येथे केली.
1923 - कथाकार, कादंबरीकार, समीक्षक प्रा. लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म.
1973 - गायक, संगीतकार, निर्माता कैलास खेर यांचा जन्म.
1981 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा जन्म.
1985 - बोरीस बेकर याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत चॅम्पियनशिप मिळवली.