आज जन्मलेली मुलंकन्या राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना शुक्र हर्षल शुभयोगाचे प्रतिसाद विशेष यशाने पुढे पुढे घेऊन जातील. त्यात अभिनव आणि चमत्कारिक प्रसंग राहतील. त्यामुळे प्रसिद्धी मिळविता येईल.परदेशाशी संबंध येऊ शकतील. कन्या राशी 'प', 'ठ', 'ण' अक्षर.- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचागसोमवार, दि. 8 जुलै 2019- भारतीय सौर 17 आषाढ 1941- मिती आषाढ शुद्ध षष्ठी 7 क. 42 मि.- उतरा नक्षत्र 18 क. 78 मि. कन्या चंद्र- सूर्योदय 06 क. 8 मि. सूर्यास्त 07 क. 19 मि.
दिनविशेष1910 - मारिया बोटीतून स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडनमध्ये अटक करुन हिंदुस्थानात नेले जात असताना मार्सेलिस बंदरानजीक त्यांनी जहाजाच्या पोर्ट होलमधून समुद्रात उडी टाकली.1914 - पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म.1916 - श्रेष्ठ मराठी कादंबरीकार, दुर्गप्रेमी गोपाल नीलकंठ दांडेकर यांचा जन्म.1958 - प्रसिद्ध अभिनेत्री नितू सिंग-कपूर यांचा जन्म1970 - अमेरिकन टेनिसपटू व प्रशिक्षक टोड मार्टिन यांचा जन्म.1972 - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा जन्म.
शुभाशुभ चौघडीदिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.दिवसा- सकाळी 6 ते 7.30 अमृत, 7.30 ते 9 काल, 9 ते 10.30 शुभ, 10.30 ते 12 रोग, 12 ते 1.30 उद्वेग, 1.30 ते 3 चंचल, 3 ते 4.30 लाभ, 4.30 ते 6 अमृत. रात्री - 6 ते 7.30 चंचल, 7.30 ते 9 रोग, 9 ते 10.30 काल, 10.30 ते 12 लाभ, 12 ते 1.30 उद्वेग, 1.30 ते 3 शुभ, 3 ते 4.30 अमृत, 4.30 ते 6 चंचल.