आज जन्मलेली मुलं
कर्क राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना गुरुचे सहकार्य मिळेल. त्यातून काही प्रांतात आगेकूच सुरु ठेवता येईल. रवि चंद्र युतीचे आव्हान त्यात असल्याने कार्यपद्धतीमध्ये कोणताही धोका स्वीकारु नका. प्रयत्न, प्रार्थना यामधून सफलता सोपी होईल. कर्क राशी 'ड', 'ह' आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचाग
गुरुवार, दि. 01 ऑगस्ट 2019
- भारतीय सौर 10 श्रावण 1941
- मिती आषाढ वद्य अमावास्या 8 क. 42 मि.
- पुष्य नक्षत्र 12 क. 11 मि., सूर्यास्त 07 क. 13 मि.
- गुरुपुष्यामृत
दिनविशेष
1879- पत्रकार व साहित्यिक अच्युत बळवंत कोल्हाटकर यांचा जन्म.
1882- स्वातंत्र्यसेनानी, राजनीतिज्ञ भारतरत्न पुरुषोत्तमदास टंडन यांचा जन्म.
1910- भारतीय क्रिकेट खेळाडू महंमद निसार याचा जन्म.
1913- प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचा जन्म.
1920- लोकशाहीर, कथा कादंबरीकर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म.
1920- भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महान नेते, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन.
1932- चित्रपट अभिनेत्री मीनाकुमारी हिचा जन्म.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.
दिवसा - सकाळी 6 ते 7.30 शुभ, 7.30 ते 9 रोग, 9 ते 10.30 उद्धेग, 10.30 ते 12 चंचल, 12 ते 1.30 लाभ, 1.30 ते 3 अमृत, 3 ते 4.30 काल, 4.30 ते 6 शुभ. रात्री - 6 ते 7.30 अमृत, 7.30 ते 9 चंचल, 9 ते 10.30 रेग, 10.30 ते 12 काल, 12 ते 1.30 लाभ, 1.30 ते 3 उद्धेग, 3 ते 4.30 शुभ, 4.30 ते 6 अमृत.