Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, दि. 02 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 07:24 AM2019-08-02T07:24:35+5:302019-08-02T07:26:22+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आज जन्मलेली मुलं
9 क. 29 मि. पर्यत कर्क राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर सिंह राशीचे मुले जन्म घेतील. विचारांना वेग असतो, कर्तृत्व कार्यभाग साधणार असते. अनेक प्रांतातील मुलांना त्याची प्रचिती येऊ शकेल. परिवार ते व्यवहार यामध्ये मुलांची प्रगती विशेष राहील. कर्क राशी 'ड', 'ह' आद्याक्षर. सिंह राशी 'म', 'ट' आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचाग
शुक्रवार, दि. 02 ऑगस्ट 2019
- भारतीय सौर 11 श्रावण 1941
- मिती श्रावण शुद्ध द्वितीया 25 क. 36 मि.
- आश्लेषा नक्षत्र 9 क. 29 मि., कर्क चंद्र 9 क. 29 मि.
- सूर्योदय 06 क. 17 मि., सूर्यास्त 07 क. 13 मि.
दिनविशेष
1861- बंगालमधील महान संशोधक रसायनशास्त्र व देशभक्त प्रफुलचंद्र रे यांचा जन्म.
1876- स्वातंत्र्यसैनिक, भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकैया यांचा जन्म.
1877- स्वातंत्र्यसेनानी तथा ज्येष्ठ क्रॅागेस नेते पंडीत रविशंकर शुक्ल यांचा जन्म.
1910- कवी, कादंबरीकर, अर्थशास्त्रज्ञ पुरुषोत्तम शिवराम तथा पु. शि. रेगे यांचा जन्म.
1958- भारतीय क्रिकेट खेळाडू अर्शद आयुब याचा जन्म.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.
दिवसा - सकाळी 6 ते 7.30 चंचल, 7.30 ते 9 लाभ, 9 ते 10.30 अमृत, 10.30 ते 12 काल, 12 ते 1.30 शुभ, 1.30 ते 3 रोग, 3 ते 4.30 उद्धेग, 4.30 ते 6 चंचल. रात्री - 6 ते 7.30 रोग, 7.30 ते 9 काल, 9 ते 10.30 लाभ, 10.30 ते 12 उद्धेग, 12 ते 1.30 शुभ, 1.30 ते 3 अमृत, 3 ते 4.30 चंचल, 4.30 ते 6 रोग.