आज जन्मलेली मुलं
25 क. 9 मि. पर्यत मुलं मेष राशीत असतील. त्यानंतर वृषभ राशीच्या प्रांतात प्रवेश करतील. प्रयत्न प्रगतीच्या समन्वयातून मुलांचा प्रभाव वाढत राहील. बडी बडी मंडळी सहवासात येतील. नवीन उपक्रम त्यातून पुढे सरकत राहतील. मेष 'अ', 'ल', 'ई'. वृषभ राशी 'ब' व 'ऊ' आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचाग
शुक्रवार, दि. 26 जुलै 2019
- भारतीय सौर 4 श्रावण 1941
- मिती आषाढ वद्य नवमी 19 क. 57 मि.
- भरणी नक्षत्र 18 क. 57 मि. मेष चंद्र 25 क. 9 मि.
- सूर्योदय 06 क. 15 मि., सूर्यास्त 07 क. 16 मि.
दिनविशेष
1856 - प्रख्यात नाटककार जॅार्ज बर्नाड शॅा यांचा जन्म.
1893 - ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म.
1934 - भारतीय अर्थशास्त्रज्ञ जगदीश एन. भगवती यांचा जन्म.
1982 - अभिनेत्री मुग्धा गोडसे हिचा पुणे येथे जन्म.
1999 - कारगिल युद्ध समाप्ती. विजयी दिन.
2009 - संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.
दिवसा - सकाळी 6 ते 7.30 चंचल, 7.30 ते 9 लाभ, 9 ते 10.30 अमृत, 10.30 ते 12 काल, 12 ते 1.30 शुभ, 1.30 ते 3 रोग, 3 ते 4.30 उद्धेग, 4.30 ते 6 चंचल. रात्री - 6 ते 7.30 रोग, 7.30 ते 9 काल, 9 ते 10.30 लाभ, 10.30 ते 12 उद्धेग, 12 ते 1.30 शुभ, 1.30 ते 3 अमृत, 3 ते 4.30 चंचल, 4.30 ते 6 रोग.