आज जन्मलेली मुलं - क. 39 मि. पर्यंत मुले मकर राशीत असतील. त्यानंतर कुंभ राशीत प्रवेश करतील. जिद्द, कल्पकता असा प्रवाह विचारांचा राहील. शिक्षण ते व्यवहार यामधील बराच प्रवास समाधान देईल. मकर ज, ख, कुंभ ग, स अद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
शनिवार, दि. 22 जून 2019
भारतीय सौर 1 आषाढ 1941
मिती ज्येष्ठ वद्य पंचमी 21. क. 27 मि
धनिष्ठा नक्षत्र 21 क. 7 मि
मकर चंद्र 7 क. 39 मि.
सूर्योदय 06 क. 4 मि., सूर्यास्त 07 क. 18 मि.
आजचे दिनविशेष
1896 - ज्येष्ठ अभिनेते, निर्माते बाबूराव पेंढारकर यांचा कोल्हापूर येथे जन्म
1897 - क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांनी रॅण्ड आणि आयरेस्ट यांची गोळ्या घालून हत्या केली
1908 - ग्रंथकार, साक्षेपी संशोधक, संपादक विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म
1932 - अभिनेता अमरिश पुरी यांचा जन्म
1984 - लेखक व प्रकाशक गजानन लक्ष्मण ठोकळ यांचे निधन
1994 - भारतीय चित्रपटाचे अध्वर्यू एल. व्ही. प्रसाद यांचे निधन