पंचांगगुरुवार, दि. 29 ऑगस्ट 2019- भारतीय सौर 7 भाद्रपद 1941- मिती श्रावण वद्य चतुर्दशी 19 क. 56 मि.- आश्लेषा नक्षत्र 20 क. 24 मि., कर्क चंद्र 20 क. 11 मि.- सूर्योदय 06 क. 24 मि., सूर्यास्त 06 क. 55 मि.- पिठोरी अमावस्या
शुभाशुभ चौघडीदिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय-सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासून पुढे करावा. दिवसा-सकाळी : 6 ते 7.30 शुभ, 7.30 ते 9 रोग, 9 ते 10.30 उद्वेग, 10.30 ते 12 चंचल, 12 ते 1.30 लाभ, 1.30 ते 3 अमृत, 3 ते 4.30 काल, 4.30 ते 6 शुभ. रात्री : 6 के 7.30 अमृत, 7.30 ते 9 चंचल, 9 ते 10.30 रोग, 10.30 ते 12 काल, 12 ते 1.30 लाभ, 1.30 ते 3 उद्वेग, 3 ते 4.30 शुभ, 4.30 ते 6 अमृत.
दिनविशेष1880 - स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ साहित्यिक माधव श्रीहरी अणे यांचा जन्म1909 - सहकारमहर्षी, पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांचा जन्म.1905 - हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म.1929 - अभिनेता, गांधी चित्रपटाचे निर्माते रिचर्ड अॅटनबरो यांचा जन्म.1958 - पॉप गायक मायकेल जॅक्सन यांचा जन्म1969 - लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचे निधन.2008 - ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.
आज जन्मलेली मुलंकर्क राशीच्या मुलांच्या सीमारेषा 20 क. 11 मि. येथपर्यंत आहे. पुढे मुले सिंह राशीच्या सहवासात राहातील, प्रगल्भ विचार आणि प्रयत्नातील जिद्द यामधून मुले आकर्षक यश संपादन करतील. संस्कारातून सफलता मोठी होत राहाते याचे विस्मरण नको. कर्क राशी ड, ह, सिंह राशी म, ट अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी