आजचे पंचाग
गुरुवार, दि. 2 जानेवारी 2020
भारतीय सौर 12 पौष 1941
मिती पौष शुद्ध सप्तमी 21 क. 01 मि.
उतरा भाद्रपदा नक्षत्र, अहोरात्र, मीन चंद्र
सूर्योदय 07 क. 13 मि., सूर्योस्त 06 क. 12 मि.
आज जन्मलेली मुलं
मीन राशीत जन्मलेली आजची मुले बुध- गुरु युतीमुळे प्रगल्भ विचारांची असतील. त्यामुळे शिक्षण आणि बौद्धिक प्रांत यात त्यांचा प्रभाव राहील. सत्कारणी परिश्रमाचा आनंद त्यातूनच मिळविता येईल. माता पित्यास शुभ. मीन राशी ज, च अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1881- लोकमान्य टिळकांनी मराठा नियतकालिक सुरु केले.
1944- महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन.
1952- प्रसिद्ध शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.
1959- प्रसिद्ध क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.
1959- रशियाने ल्यूना- 1 हे यान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
1960- क्रिकेटपटू रमण लांबा याचा जन्म.
2015- भारतीय शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन.