8 क. 56 मी. पर्यंत मिथुन राशीची मुले जन्म घेतील. त्यानंतरची मुले कर्क राशीची असतील. वेगवान विचार आणि प्रवाहाशी समरस होणारी प्रवृत्ती यामधून मुलांचा यशस्वी प्रवास, शिक्षण, अधिकार, प्राप्ती या क्षेत्रात होईल. मिथुन राशी क, छ, घ, कर्क राशी ड,ह अक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
शुक्रवार, दि. 10 मे 2019
भारतीय सौैर 20 वैशाख 1941
मिती वैशाख शुद्ध षष्ठी 21 क. 42 मी.
पूनर्वसू नक्षत्र 14 क 21 मि., मिथुन चंद्र 8 क 36 मि.
सूर्योदय 06 क. 8 मि., सूर्यास्त 07 क 3 मि.
श्री नृसिंह नवरात्र प्रारंभ
दिनविशेष
1927 - लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म
1932 - ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांचा जन्म
1937 - आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा माणिक गोडघोटे यांचा जन्म
1981 - विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा विनायक माधव दिक्षित पटवर्धन यांचे निधन
1993 - भारताची संतोष यादव ही दोनदा एव्हरेस्ट पर्वत चढून जाणारी पहिली महिला ठरली
1998 - पत्रकार, समाजसेवक, ज्येष्ठ साहित्यिक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन
2015 - भारतीय इतिहासकार निनाद बेडेकर यांचे निधन