मिथुन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना बुध-हर्षल शुभयोगाचे मिळणारे वरदान एक कार्यशक्ती निर्माण करु शकेल. त्यात शिक्षणातला प्रभाव एकापेक्षा अधिक पदवीत समारोप करील. उद्योग केंद्रावर अनपेक्षित संधीतून नेत्रदीपक यश मिळू शकेल. जन्मनाव क, छ, घ अक्षरावर राहील.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
बुधवार, दि. 8 मे 2019
भारतीय सौर 18 वैशाख 1941
मिती वैशाख शुद्ध चतुर्थी 24 क. 59 मी.
मृग नक्षत्र 16 क. 00 मि., मिथुन चंद्र
सूर्योदय 06 क. 9 मि. सूर्यास्त 07 क. 2 मि.
विनायकी चतुर्थी
दिनविशेष
1906 - भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राण नाथ थापर यांचा जन्म
1916 - चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म
1920 - पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयाचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन
1962 - कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना
1982 - 40 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी 'अनिल' यांचे निधन