आजची मुले सिंह राशीत आहेत. प्रयत्नाने यश मिळवणारी आहेत. बौद्धिक क्षेत्रात आणि उद्योग नोकरी यामध्ये स्वतचा प्रभाव प्रथास्पित करु शकतील. परिचित परिवार मोठा राहील. सिंह राशी म, ट, अक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
सोमवार, दि. 13 मे 2019
भारतीय सौर, 23 वैशाख 1941
मिती वैशाख शुद्ध नवमी 15 क. 21 मी.
मघा नक्षत्र 10 क 27 मि. सिंह चंद्र
सूर्योदय 06 क 6 मि., सूर्यास्त 07 त 4 मि.
दिनविशेष
1918 - प्रख्यात भरतनाट्यम नर्तकी बालासरस्वती यांचा जन्म
1925 - प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म
1932 - समीक्षक प्रा. डॉ. गो. मा पवार यांचा जन्म
1959 - इतिहास लेखक व पत्रकार शंकर दामोदर पितळे यांचे निधन, फेंच राज्यक्रांती, इटलीचे स्वातंत्र्य युद्ध आणि भारताचा सांस्कृतिक इतिहास ही त्यांची गाजलेली ग्रंथसंपदा
1962 - थोर शिक्षणतज्ज्ञ व तत्त्वज्ञ सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले.