Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 9 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 07:03 AM2019-05-09T07:03:25+5:302019-05-09T07:03:54+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
मिथुन राशीतील आजची मुले शुक्र-गुरु नवपंचम योगामुळे अनेक प्रातांत स्वत:चा ठसा उमटवतील. त्यात शिक्षण, कला, संगीत, व्यापार यांचा समावेश राहील. मधून मधून प्रवास करीत राहतील. माता-पित्यास शुभ. जन्मनाव क, छ, घ अक्षरे
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
गुरुवार 9 मे 2019
भारतीय सौर 19 वैशाख 1941
मिती वैशाख शुद्ध पंचमी 23 क 27 मी.
आर्द्रा नक्षत्र 15 क 17 मि. मिथुन चंद्र
सूर्योदय 06 क. 8 मि. सूर्यास्त 07 क. 2 मि
श्री आद्य शकराचार्य जयंती
दिनविशेष
1814 - अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म
1866 - थोर समाजसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील कातळूक येथे जन्म
1917 - डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांचे निधन
1919 - रेव्हदंड नारायण वामन टिळक यांचे निधन
1951 - महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांचे पुणे येथे निधन
1986 - एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेरपा तेनसिंग यांचे निधन