परमात्म्याशी नाळ जुळल्यास आयुष्याचा कायापालट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:14 PM2019-08-03T13:14:14+5:302019-08-03T13:14:54+5:30
चातुर्मास विशेष...
जीवनात खºया अर्थाने तरायचे असेल तर धर्मकार्यात सहभागी होऊन परमात्म्याशी नाळ जुळेल असे वर्तन केल्यास आयुष्याचा कायापालट होईल. गुरूचरणी, परमात्म्याच्या चरणी लीन व्हा, गुरूच्या सान्निध्यातच आत्मिक आनंदाची प्राप्ती होते. सत्य म्हणजे धर्म, प्रकाश व सुख होय तर असत्य म्हणजे अधर्म, अंध:कार, दु:ख होय. म्हणून सदैव सत्य मार्गाने चाला. अ म्हणजे अज्ञान, अंध:कार, अहंकार नको. अहंकाररूपी अंध:कारात भरकटू नका.
भौतिक सुखाच्या मागे न लागता गुरू आणि परमात्म्याच्या चरणी समर्पित व्हा. स्वामीसेवेतच आनंद आहे, आत्मिक आनंद प्राप्त होईल. यासाठी मुनीजींन ी जंबू राजकुमाराने सर्व सुखांचा त्याग केल्याचे उदाहरण दिले.
जीवनात जर तुम्हाला खºया अर्थाने तरायचे असेल तर धर्मकाळात सहभागी व्हा, आपली नाळ एकदा परमात्म्याशी जोडली गेली तर खºया अर्थाने आपले जीवन सुधारेल, इतरांवर आपला प्रभाव पडेल. जीवदयेसाठी सर्वस्व अर्पण केलेल्या चंपकशेठ चरित्रावर त्यांनी प्रकाश टाकला. जंबूकुमारने एकाच दिवसात ५२७ जणांंना दीक्षा घेण्यास प्रवृत्त केल्याचे गौतममुनीजी म.सा. म्हणाले.
- गौतममुनीजी म.सा.