नितीन कांबळे
शेतकऱ्यांचा जोडव्यवसाय म्हणून बघितल्या जाणाऱ्या दूध उत्पादनात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. दूध उत्पादन शुल्क अधिक आणि दुधाचे दर कमी झाल्याने पशुपालकांतून संताप व्यक्त होत आहे.
यावर्षी तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे मार्च महिन्यातच चारा व पाणीटंचाई निर्माण झाली. अनेक ठिकाणी तलाव कोरडेठाक पडले आहेत. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जनावरांना लागणारा हिरवा चारा पाण्याअभावी जळून गेला आहे. हिरवा चारादेखील विकत घ्यावा लागत आहे. एक लिटर दुधाला जवळपास २२ रुपये उत्पादन खर्च आहे. मात्र, दुधाला केवळ २४ ते २५ रुपये लिटर दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात तुटपुंजे पैसे पडतात.
दूध काढतांना हे ठेवा ध्यानी; व्यवसायातून मिळेल हमखास मनी
आष्टी दूध उत्पादनात मराठवाड्यात होते अव्वल
मराठवाड्यात सर्वांत जास्त दूध उत्पादन आष्टी तालुक्यात होत असे. सुशिक्षित, बेरोजगार, युवकांना नोकऱ्या लागत नसल्याने ते शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाकडे वळले. मात्र, सध्या दूध उत्पादन घसरल्याने याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे.
उत्पादन शुल्क, दुधाच्या दरातील तफावत [प्रकार, दर, प्रमाण]
₹२४०० | भुसा (१ क्विंटल) |
₹३१०० | सरकी पेंड (१ क्चिंटल) |
₹५००० | पत्री पेंड (१ क्विंटल) |
₹४३०० | वैरण (शेकडा) |
₹३७०० | गोळी पेंड (१ क्विंटल) |
₹३३०० | ऊस (१ टन) |
एक लिटर पाणी खरेदी करण्यासाठी २० रुपये मोजावे लागतात. मात्र, एक लिटर दुधाचे शेतकऱ्यांच्या हातात २५ रुपये येतात. मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली आहे. अनेक गावांत जनावरांच्या पाण्याची टंचाई आहे. हिरवा चारा, मजुरी, ढेप यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागतात. एक लिटर दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना २० ते २२ रुपये खर्च येतो.