Join us

शेतीपूरक उद्योगासाठी मिळेल २ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2023 9:14 AM

शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुणही यात मागे राहू नयेत यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने कृषी पायाभूत निधी (एआयएफ) ही योजना सुरू केली आहे.

नवी दिल्ली सरकारी नोकऱ्यांसाठी सध्या कमालीची स्पर्धा आहे. चांगले शिक्षण घेतले असले तरी खासगी क्षेत्रातही चांगल्या पगारासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. अशा स्थितीत युवकांना रोजगार करून आर्थिक प्रगती साधता यावी, यासाठी केंद्र सरकारकडून अनेक सुविधा पुरविल्या जातात. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुणही यात मागे राहू नयेत यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने कृषी पायाभूत निधी (एआयएफ) ही योजना सुरू केली आहे. यातून शेतीसंबंधित पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अर्थसाह्य केले जाते. शेतीशी संबंधित उद्योग करावयाचा असेल तर युवकांना या योजनेतील लाभ मिळू शकतात.

योजनेची वैशिष्ट्ये- ६% व्याजदराने- १७ वर्षांसाठी कर्ज- दोन कोटींपर्यंत विनातारण कर्ज- ३% पर्यंत व्याज सवलत बँकाकडून ६० दिवसांत कर्ज प्रक्रियेची पूर्तता

१ लाख कोटी रुपयेअर्थसाहाय्य देणार या योजनेतून २०२५ ते २६ या काळात १ लाख कोटींचे कर्ज वितरित करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. यातून व्याजदर सवलत आणि क्रेडिट हमी साहाय्य २०३२-३३ पर्यंत दिले जाणार आहे.

कोणाला मिळू शकते?उत्पादक गट, शेतकरी बचत गट, सहकारी संस्था आणि संयुक्त दायित्व गट आदीना मोठा प्रमाणात आर्थिक सहायता दिली जाते. पायाभूत सुविधाशी संबंधित उद्योग उभारणीतून उत्पन्न वाढविण्यासाठी तरुणाना प्रेरित केले जात आहेत.

कशासाठी मिळेल अर्थसहाय्य?शेतीचे उत्पादन वाढवणे, पिकाची कापणी, तसेच साठवणूक करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणे याच उद्देशाने कृषी पायाभूत निधी सुरु करण्यात आला आहे. यातून शेतकऱ्यांना शीतगृह उभारणे, शेती प्रक्रिया उद्योग उभारणे, वेअरहाऊस तसेच पॅकेजिंग युनिट उभारणे आदी शेतीपूरक उद्योगांसाठी दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

अधिक माहितीसाठी वेबसाईटhttp://agriinfra.dac.gov.in

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकफलोत्पादनशेतीकेंद्र सरकारव्यवसाय