Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > Agriculture News : यंदा नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होणार का? जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : यंदा नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होणार का? जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News Will sugar factory start in Nandurbar district 2024 year Know in detail  | Agriculture News : यंदा नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होणार का? जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : यंदा नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होणार का? जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : आयान शुगर कारखान्याचे दिवाळीच्या पर्वात अग्निप्रदीपन होण्याची शक्यता आहे. इतर दोन कारखाने सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. 

Agriculture News : आयान शुगर कारखान्याचे दिवाळीच्या पर्वात अग्निप्रदीपन होण्याची शक्यता आहे. इतर दोन कारखाने सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

नंदुरबार : दरवर्षी दसरा किंवा त्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) तिन्ही साखर कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन होत असे. यंदा पाऊस लांबल्याने आणि तीनपैकी दोन कारखान्यांची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने यंदा कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन दसऱ्याला होऊ शकले नाही. आयान शुगर कारखान्याचे दिवाळीच्या पर्वात अग्निप्रदीपन होण्याची शक्यता आहे. इतर दोन कारखाने सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी तिन्ही साखर कारखान्यांकडून (Sugar Factory) साखर हंगाम घेतला जात होता. शहाद्याचा सातपुडा साखर कारखाना काही अडचणींमुळे गेल्यावर्षी बंद होता. नंदुरबारच्या आयान शुगर लिमिटेड कारखान्याने गेल्यावर्षी सर्वाधिक साखर उत्पादन घेतले होते. तर नवापूरचा आदिवासी साखर कारखान्याने देखील आपल्या गाळप क्षमतेप्रमाणे उत्पादन घेतले होते. यंदा या तीनपैकी केवळ आयान कारखाना सुरु होण्याची शक्यता आहे. आदिवासी साखर कारखाना सुरू व्हावा, यासाठी संचालक मंडळाने कंबर कसली आहे. 

तिन्ही साखर कारखाने राहत होते सुरू 
गेल्या वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी तीन साखर कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप करण्याचे उदाहरण धुळे-नंदुरबार जिल्ह्यात केवळ नंदुरबारात राहत होते. सातपुडा साखर कारखाना पाच हजार मे.टन प्रतिदिन ऊस गाळप क्षमतेचा आहे. या कारखान्याने गेले दोन, तीन हंगाम वगळता दरवर्षी पूर्ण क्षमतेने गाळप करण्याचा प्रयत्न राहिला आहे. आयान शुगर कारखाना पूर्वी सहकारी तत्त्वावर होता. नंतर तो खासगी कंपनीने विकत घेतल्यानंतर या कारखान्याची गाळप क्षमता थेट १० हजार मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेवर गेली. त्यानुसार हा कारखाना देखील दरवर्षी क्षमतेप्रमाणे गाळप करीत आहे. आदिवासी साखर कारखाना १,२५० मे.टन प्रतिदिन ऊस गाळप क्षमतेचा आहे. त्यानुसार कारखाना गाळप करीत आला आहे. यंदा मात्र ऊस गाळपावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हंगाम लांबणार? 
यंदा पाऊस लांबल्याने व येत्या काळात देखील पावसाचा अंदाज असल्याने यंदा साखर हंगाम लांबण्याची शक्यता आहे. दरवर्षी दसन्याला कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन होत असते. यंदा दसरा, दिवाळी लवकर आल्याने व पाऊस लांबल्याने दसन्याला बॉयलर अग्निप्रदीपन होऊ शकले नाही. आयान शुगर कारखान्याचे दिवाळीच्या मुहूर्तावर बॉयलर अग्निप्रदीपन होऊन नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कारखाना सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कारखान्याने नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र घटल्याने चिंता... 
यंदा उसाचे क्षेत्र साधारणतः चार ते पाच हजार हेक्टरने घटले आहे. असे असले तरी तीनपैकी किती कारखाने सुरू होतात, यावर ऊस पुरवठाची स्थिती अवलंबून राहणार आहे. सातपुडा साखर कारखाना यंदा सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कारखाना सुरू होऊ शकला नव्हता. हंगाम पूर्व दुरुस्ती लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नवापूरच्या आदिवासी सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखाना सुरू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आयान शुगर कारखान्याने मात्र कारखाना सुरू करण्याची पूर्ण तयारी करून ठेवली आहे. 

Web Title: Agriculture News Will sugar factory start in Nandurbar district 2024 year Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.