Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांमार्फत कृषि मूल्यसाखळीद्वारे शेतमाल विक्री व्यवस्थापन

शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांमार्फत कृषि मूल्यसाखळीद्वारे शेतमाल विक्री व्यवस्थापन

Agriculture Value Chain Management of agricultural product sales through agricultural value chain through farmer producer companies and cooperatives | शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांमार्फत कृषि मूल्यसाखळीद्वारे शेतमाल विक्री व्यवस्थापन

शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांमार्फत कृषि मूल्यसाखळीद्वारे शेतमाल विक्री व्यवस्थापन

नव्वदच्या दशकातील १९९० ते २००० या कालावधीत महिला व पुरुष यांची दिवसाला २० ते ५० रूपये मजूरी होती. परंतू २०२३-२४ मध्ये मजुरीच्या दराची  परिस्थिती पाहिली तर, सुमारे ३०० ते ५०० रूपये मजूरी दिवसाला घेतली जाते आहे. म्हणजेच साधारणपणे मागील ३० वर्षात मजूरीमध्ये जवळपास १० ते १५ पट वाढ झाली आहे. 

नव्वदच्या दशकातील १९९० ते २००० या कालावधीत महिला व पुरुष यांची दिवसाला २० ते ५० रूपये मजूरी होती. परंतू २०२३-२४ मध्ये मजुरीच्या दराची  परिस्थिती पाहिली तर, सुमारे ३०० ते ५०० रूपये मजूरी दिवसाला घेतली जाते आहे. म्हणजेच साधारणपणे मागील ३० वर्षात मजूरीमध्ये जवळपास १० ते १५ पट वाढ झाली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

भारतातील लहान आणि सिमांत शेतकरी जागतिकरणाच्या या युगात कदाचित फायद्याची शेती करीत असतील. अशा उत्पादकांच्या कमकुवत बाजूचा विचार करून त्याची तुलना इतर शेतकरी वर्गाशी केली तर त्यांचे शोषण होते अथवा नाही याची निरीक्षणे नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. याच्या दोन बाजू असू शकतात. एक म्हणजे गरीब जनता व त्याच्या गरीबीकडे दुर्लक्ष करणे किंवा अशा वर्गाकरीता आरक्षण व अनुदानाशी निगडीत गरीबी वाढविणाऱ्या धोरणांची निर्मिती करून त्यावरील अवलंबित्व वाढविणे. सर्व स्तरातील कृषि मुल्यसाखळीतील भागधारकांचा यामुळे कसा फायदा होतो अथवा त्यातील उत्पादक वर्गाचे शोषण होऊन वर्षानुवर्षे ते कसे उपेक्षित राहतात याची अनेक उदाहरणे कृषि क्षेत्रातील विविध कृषिमुल्य साखळ्यांच्या अभ्यासातून दिसू शकेल. छोटा शेतकरी किंवा उत्पादक आणि ग्रामीण शेतमजूर एकेकाळी मजूरी कमी असल्याने स्वस्त दरात कमी मजूरी घेऊन कामकाज करीत होता. 

नव्वदच्या दशकातील १९९० ते २००० या कालावधीत महिला व पुरुष यांची दिवसाला २० ते ५० रूपये मजूरी होती. परंतू २०२३-२४ मध्ये मजुरीच्या दराची  परिस्थिती पाहिली तर, सुमारे ३०० ते ५०० रूपये मजूरी दिवसाला घेतली जाते आहे. म्हणजेच साधारणपणे मागील ३० वर्षात मजूरीमध्ये जवळपास १० ते १५ पट वाढ झाली आहे. 

सकाळी १० ते ५ आणि मध्ये १ तास जेवणाची सुट्टी अशी मजूरी करण्याची प्रथा शेतमजूराकडून निर्माण केली जात असल्याने शेतकरी शेतीपेक्षा मजूरी बरी असे मत मांडतो. भारतातच काय पण संपूर्ण जगात कमी अधिक प्रमाणात सुधारणा करू पाहणाऱ्या देशांमध्ये सारखीच परिस्थिती आहे. छोटे शेतकरी यावर उपाययोजना म्हणून घरातील सदस्यांचा शेतमजूर म्हणून गरजेनुसार व मागणी पुरवठयानुसार उपयोग करून घेतात, जेणेकरून आर्थिक खर्चात बचत होण्यास मदत होते.

गरीबी हा अनिश्चितता व भेदभाव करण्याचा एक महत्वाचा पर्याय असून यामध्ये कमी उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट किंवा नियमित उत्पन्न गट असे प्रकार पडतात. छोटा उत्पादक वर्ग नेहमी काम करण्यास किंवा आवाहनास सामोरे जाण्यास तत्पर असतो. तो कोणतेही काम वेळ काळ याची परवा न करता केव्हाही करण्यास नेहमीच तयार असतो. असा वर्ग पैसे कमविण्यासाठी अगदी अचानक दिलेल्या निरोपानंतरही मोठया अंतराचा कमी वेळेत प्रवास करून काम करण्यास तयार असतो. 

तसेच तो रोजच्या व नेहमीच्या वेळेनंतरही काम करण्यास तत्पर असून कोणत्याही हवामानात अवघड परिस्थितीत काम देणाऱ्या मालकाच्या गरजेनुसार काम करण्यास तयार असतात. असा शेतमजूर अथवा शेतकरी वर्ग एकाच वेळेस दिवसभरात अनेक कामे करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो, जेणेकरून त्याला इतर लहान उत्पादकांशी स्पर्धा करणे शक्य होऊ शकेल, यासाठी हा त्याचा एक प्रयत्न असतो. अशा वर्गाकडे ही लवचिकता गरीबीमुळेच येते. यामध्ये त्यांचे शोषण त्यांच्या स्वत:च्या फायद्यासाठी व त्या सोबतच काम देणाऱ्या मालकाच्या नफ्यासाठी केले जाते.

छोटे आणि सिमांत शेतकरी त्याबरोबरच कारागिर वर्ग, लहान व स्वस्त शेतमजूराप्रमाणे आपल्या सेवा देण्याकरीता स्थलांतर करतात. कमी वयाच्या मजूरांना काम न देणे अथवा कामावर न घेणे सोपे असते, कारण ते बेकायदेशीर आणि अनैतिक असते. परंतु पोटाची खळगी भरण्याचा दुसरा पर्याय नसल्याने कमी वयाच्या मजूरांना काम ते काम करावे लागते. लहान कारागिर आणि शेतकरी एकत्रितरित्या उत्पादक काम करून एका कुटुंबाप्रमाणे कमी मजूरीत काम करू शकतात. यानंतर हे उत्पन्न संकलित करून एका मजूरापेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकतात, परंतु यामध्ये त्याला स्वत:ला एकटयाला कुटुंबाला मागे ठेवून दूरवर प्रवास करावा लागतो. 

अशा प्रकारचा शेतकरी वर्ग शिक्षित झालेला नसला व  आधुनिक जगातील कौशल्य त्यांनी आत्मसात केलेले नसले, तरीही त्यांच्याकडे शेतीतील व हस्तकलेतील पारंपारिक ज्ञान आणि कौशल्य असल्याने त्याचे वेगळे विशेष फायदे त्यांना मिळू शकतात. याबाबत वेगळे प्रयत्न करणे आवश्यक असून या कौशल्यातून निर्माण झालेल्या वस्तूंची पर्यटक किंवा पुरातन वस्तू संग्रहालय संकलनकर्ते यांना आवड असते. 

जागतिक बाजारपेठेत घडणाऱ्या विविध घडामोडी व नवीन पध्दती छोटे उत्पादक शिकून  घेतात आणि त्यामुळे त्यांना इतरांशी स्पर्धा करणे सोपे जाते. उदाहरण घ्यायचे झाल्यास परदेशी भाजीपाला पिकविणाऱ्या लहान शेतकरी वर्गाचे उदाहरण घेतल्यास वरील संकल्पना किंवा हेतू लक्षात येईल. छोटा शेतकरी परदेशी भाजीपाला पिकवून त्यातून उदरनिर्वाह करीत असल्याची अनेक उदाहरणे राज्यात तसेच संपूर्ण देशभरात पाहावयास मिळू शकतील. 

या शेतकरी वर्गाला कोणतेही शिक्षण नसताना त्यांनी परदेशी भाजीपाला लागवडीचे तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या  उपजिविकेचा मार्ग विकसित केला आहे. यात त्यांनी पारंपारीक शेतीचे कौशल्य वापरून परदेशी भाजीपाला लागवड, त्याचे पॅकिंग, प्रतवारी व ग्राहकाच्या आवडीनुसार सर्व पर्याय वापरून या जागतिक बाजारपेठेच्या गरजेनुसार स्वत:ला बदलून घेऊन एका नव्या कृषि मुल्य पुरवठा साखळीत सहभाग घेतला आहे. 
        
या लहान उत्पादकांमध्ये अत्यंत सामान्य छोटा शेतकरी सुध्दा तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत असून देशस्तरावर आणि देशाबाहेरही मोठ्या शेतकऱ्याच्या  तुलनेत पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा आधार घेऊन इतर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, त्यांची स्वत:ची बलस्थाने ओळखून त्याचा फायदा घेऊ शकतो, जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजिविकेत सुधारणा करून उत्पन्नात वाढ करण्यास मदतच होऊ शकते.
        
कृषिमूल्य साखळीतील धोके खूपच ताकदवान, तात्काळ उत्पन्न देणारे आणि दृश्य स्वरूपात असतात. हे धोके वेगवेगळया स्वरुपात असून ते कायमचे त्या त्या परिस्थितीत उद्भवणारे व सामान्य शेतकऱ्यावर तीव्र आर्थिक परिणाम करणारे असू शकतात व अशा प्रभावांमुळे छोटा शेतकरी वास्तविकपणे अशी प्रगती करण्यास कारणीभूत असणाऱ्या कृषिमुल्य साखळीत सहभागी होण्यास धजावत नाही, त्यामुळे तो या प्रगतीपासून दूरच राहतो, किंवा परिस्थितीनुसार त्याला पिढ्यान् पिढ्यापासून वगळले जाते. 

शेती करताना येणाऱ्या नवीन संधी अंत्यत आकर्षक व अकल्पित असू शकतात परंतू त्याचे आकलन सामान्य व छोटया शेतकरी वर्गाला होईलच असे नाही, किंबहुना ते अत्यंत अवघड असते. या संधी शाश्वत उत्पन्नाच्या नवीन आशा घेऊन येतात. परंतू भारतातील लाखो लहान शेतकरी यापासून बरेच दूर आहेत अथवा त्यांना यातून वेळोवेळी वगळण्यात येते. नवीन घडामोडी ह्या  प्रगतीच्या पहिल्या टप्प्यातील पायऱ्या आहेत, असे बोलणे बहुदा उपरोधिक होऊ शकते, आणि या घडामोडीना आधुनिक शेतीनंतरचा पहिला टप्पा समजण्यास हरकत नाही. 

यामध्ये आर्थिक उत्पन्न वाढीचा अनुभव घेतलेला व आर्थिक उत्पन्न वाढीमुळे समाधानी असलेला शेतकरी त्याच्या प्रमुख गरजांच्या पुढच्या टप्प्यात पोहोचलेला असू शकतो. काही महत्वाच्या संवाद साधण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या पध्दतीमुळे काही लहान शेतकरी एकत्र येऊ शकले तर ते उत्तम पुरवठा साखळ्या निर्माण करून प्रगती करू शकतात, परंतु ज्या शेतकऱ्याना हे जमले नाही ते प्रगतीपासून दूरच राहिल्याचे देशभरात विविध ठिकाणी प्रत्यक्ष दिलेल्या भेटींवरून निदर्शनास येते. या तंत्रज्ञानामुळे किंवा त्याचा अवलंब केल्यामुळे छोटा शेतकरी शहरी किंवा परदेशी ग्राहकाच्या अन्न व कृषि क्षेत्राशी निगडीत गरजा पूर्ण करण्यास सक्षम झाल्याचे दिसून येत असून यामूळे ग्राहकाचे समाधान सुद्धा होत आहे. 

याबाबत सेंद्रिय भाजीपाल्याचे व त्याच्या उत्पादन तंत्राचे उदाहरण घेण्यास हरकत नाही. आपल्या सर्व पिढीला अवगत आहेच की ९० च्या दशकातील शेतकऱ्याची कृषि निविष्ठा वापरून शेती करण्याची पध्दती व २०२४ च्या दशकातील कृषि निविष्ठा वापरून शेती करण्याच्या पध्दतीत मोठा फरक असून, जरी आजच्या काळात अचूक शेती पध्दतीचा अवलंब करण्यावर भर असला तरी पिकावरील रोगराईचे परिणाम, कृषि निविष्ठा वापर व त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम मूर्त स्वरूपात कॅन्सर रूपाने सुमारे ३० ते ३५ वर्षानंतर समोर येऊ लागला आहे. 

त्यामुळे जैविक शेतीकडे कल वाढत असून विषमुक्त शेती ते सेंद्रिय शेती याकडे गांभीर्याने बघितले जात आहे. शहरी व परदेशी ग्राहक बॅक टू बेसिक्स कडे वळविण्यास म्हणजे पारंपारिक शेती पद्धतीकडे वळत असल्याचे आशादायक चित्र यापुढील काळात पाहावयास मिळेल आणि त्याची सुरुवात झाल्याचे आपणास पावलोपावली दिसू लागले आहे.

- मंगेश तिटकारे (व्यवस्थापकीय संचालक, एमसीडीसी , पुणे)
- प्रशांत चासकर (शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ,प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, एमसीडीसी, साखर संकुल, पुणे) मो.नं.९९७०३६४१३०.

Web Title: Agriculture Value Chain Management of agricultural product sales through agricultural value chain through farmer producer companies and cooperatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.