Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > Amba Poli आंब्यापासून बनविलेल्या या पदार्थाला परदेशात वाढती मागणी

Amba Poli आंब्यापासून बनविलेल्या या पदार्थाला परदेशात वाढती मागणी

Amba Poli There is a growing demand for this product made from mango abroad | Amba Poli आंब्यापासून बनविलेल्या या पदार्थाला परदेशात वाढती मागणी

Amba Poli आंब्यापासून बनविलेल्या या पदार्थाला परदेशात वाढती मागणी

आंबा पोळी हा कोकणातील आंबा बागायातदारांच्या घरातील जुना व आवर्जून दरवर्षी करण्यात येणारा व जास्त प्रमाणात घरगुती वापरात येणारा असा पदार्थ आहे.

आंबा पोळी हा कोकणातील आंबा बागायातदारांच्या घरातील जुना व आवर्जून दरवर्षी करण्यात येणारा व जास्त प्रमाणात घरगुती वापरात येणारा असा पदार्थ आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आंबा पोळी हा कोकणातीलआंबा बागायातदारांच्या घरातील जुना व आवर्जून दरवर्षी करण्यात येणारा व जास्त प्रमाणात घरगुती वापरात येणारा असा पदार्थ आहे. दिवसेंदिवस परदेशात आंबा पोळीसाठी मागणी वाढत आहे.

साहित्य
आमरस १ किलो, पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइट १०० मिली ग्रॅम, साखर ४०० ग्रॅम, सायट्रिक अॅसिड ५ ग्रॅम, वेलची तुकडे ५ ते ६, तेल/तूप २ चमचे.

कृती

  • आंबा पोळी तयार करताना नुकत्याच काढलेल्या आमरसाचा व साठवलेल्या आमरसाचा वापर करणे शक्य आहे.
  • प्रथमतः चांगले चवदार घट्ट रसाचे पिकलेले आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत.
  • नंतर फळांपासून रस काढून तो १ मिलीमिटरच्या चाळणीतून चाळूण घ्यावा तो चांगला शिजवून त्यात ०.१ टक्के पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइट (१ किलो रसासाठी ५०० मिली ग्रॅम) १:०.३० या प्रमाणात साखर मिसळावी.
  • त्यात साखर व वेलची पूड मिसळून घ्यावी.
  • त्यानंतर स्टेनलेस स्टील किंवा अल्युमिनियमच्या ताटात आतल्या बाजूस तेल/तूप लावून त्यावर या आमरसाचा पातळ थर घ्यावा व रस वाळवणी यंत्रामध्ये ५५ ते ६०० सें. तापमानात वाळवावा.
  • तत्पूर्वी गरज वाटल्यास रसाच्या वजनाच्या प्रमाणात ५ टक्के सायट्रिक अॅसिड मिसळावे.
  • एक थर वाळल्यावर त्यावर दुसरा थर द्यावा व वाळवावा असे दोन ते तीन थर एकूण जाडी ३ सेंमी. होईपर्यंत घ्यावेत.
  • ह्या पोळ्या चांगल्या सुकल्यावर ताटातून काढून त्याचे सोईस्कर काप करून ते बटर पेपरमध्ये गुंडाळून प्लास्टिक पिशवीत हवाबंद करून थंड व कोरड्या ठिकाणी ठेवावेत.

अधिक वाचा: Drumstick शेवग्यापासून बनतात इतकी उत्पादने; सुरु करू शकता प्रक्रिया उद्योग

Web Title: Amba Poli There is a growing demand for this product made from mango abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.