आंबा पोळी हा कोकणातीलआंबा बागायातदारांच्या घरातील जुना व आवर्जून दरवर्षी करण्यात येणारा व जास्त प्रमाणात घरगुती वापरात येणारा असा पदार्थ आहे. दिवसेंदिवस परदेशात आंबा पोळीसाठी मागणी वाढत आहे.साहित्यआमरस १ किलो, पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइट १०० मिली ग्रॅम, साखर ४०० ग्रॅम, सायट्रिक अॅसिड ५ ग्रॅम, वेलची तुकडे ५ ते ६, तेल/तूप २ चमचे.
कृती
- आंबा पोळी तयार करताना नुकत्याच काढलेल्या आमरसाचा व साठवलेल्या आमरसाचा वापर करणे शक्य आहे.
- प्रथमतः चांगले चवदार घट्ट रसाचे पिकलेले आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत.
- नंतर फळांपासून रस काढून तो १ मिलीमिटरच्या चाळणीतून चाळूण घ्यावा तो चांगला शिजवून त्यात ०.१ टक्के पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइट (१ किलो रसासाठी ५०० मिली ग्रॅम) १:०.३० या प्रमाणात साखर मिसळावी.
- त्यात साखर व वेलची पूड मिसळून घ्यावी.
- त्यानंतर स्टेनलेस स्टील किंवा अल्युमिनियमच्या ताटात आतल्या बाजूस तेल/तूप लावून त्यावर या आमरसाचा पातळ थर घ्यावा व रस वाळवणी यंत्रामध्ये ५५ ते ६०० सें. तापमानात वाळवावा.
- तत्पूर्वी गरज वाटल्यास रसाच्या वजनाच्या प्रमाणात ५ टक्के सायट्रिक अॅसिड मिसळावे.
- एक थर वाळल्यावर त्यावर दुसरा थर द्यावा व वाळवावा असे दोन ते तीन थर एकूण जाडी ३ सेंमी. होईपर्यंत घ्यावेत.
- ह्या पोळ्या चांगल्या सुकल्यावर ताटातून काढून त्याचे सोईस्कर काप करून ते बटर पेपरमध्ये गुंडाळून प्लास्टिक पिशवीत हवाबंद करून थंड व कोरड्या ठिकाणी ठेवावेत.
अधिक वाचा: Drumstick शेवग्यापासून बनतात इतकी उत्पादने; सुरु करू शकता प्रक्रिया उद्योग