जास्त ताण सहनशील आणि उच्च आर्थिक आणि आरोग्य फायदे यामुळे ड्रॅगन फ्रुट हे फळशेतीमध्ये लागवडीसाठी एक उत्तम पर्याय आहे.
ड्रॅगन फळाचा गर, साल, बिया, फुलांच्या कळ्या आणि वाळलेली फुले आणि खोड अत्यंत पौष्टिक असतात, ज्यामध्ये शक्तिशाली बायोएक्टिव्ह संयुगे, फायबर, व्हिटॅमिन-८, कॅल्शियम आणि फॉस्फरस, आदी पौष्टिक पदार्थ असतात.
ड्रॅगन फळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी क्रियाकलापांसह मधुमेह, लठ्ठपणा, हायपरलिपिडेमिया आणि कर्करोग यांसारख्या सूक्ष्मजंतू आणि रोगांविरूद्ध फायदेशीर आहे.
हे पिक हंगामी असल्याने ड्रॅगन फळाची कापणी जून ते ऑक्टोबर या कालावधीत केली जाते, ज्यामुळे ऑफ-सीझनमध्ये उपलब्धता होणे कठीण जाते. यासाठी फळप्रक्रिया हा एकमेव पर्याय असू शकतो.
यात प्रक्रिया करून ताजे कापलेले फळ, रस, वाइन, जॅम, जेली, वाळलेल्या पावडर केली जाऊ शकते आणि ऍसिड, साखर आणि इतर चविष्ट पदार्थचा वापर करून संरक्षित केले जाऊ शकते.
१) फळांचा रस
ड्रॅगन फ्रुट गराचा रस सुधारित पौष्टिक आणि चविष्ट गुणांमुळे आणि अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीच्या उत्तम प्रमाणामुळे प्रक्रिया केलेल्या उत्पादनांपैकी लोकप्रिय उत्पादन आहे.
रस बनविण्याची कृती
१) पिकलेल्या फळांची बाहेरील साल धुणे आणि सोलणे.
२) कापणे आणि गर काढणे.
३) गर पीसणे, बियाणे काढणे (मलमलचे कापडातून गाळणे)
४) गराचा रस ३० मिनिटांसाठी एकसंधीकरण आणि स्थिरीकरण.
५) घाण काढणे.
६) पाश्चरायझेशन (८५-९० °C) ३ मिनिटे ढवळणे.
७) सामान्य तापमानाला थंड करणे आणि गाळणे.
८) बाटलीबंद (निर्जंतुक केलेला रस) साठवण (४-८ °C रेफ्रिजरेटेड तापमानात) करावी.
२) स्प्रे ड्रायिंगने केलेली गर पावडर
ड्रॅगन फळांची गर पावडर त्याच्या टिकवणक्षमता आर्थिक मूल्य आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये नैसर्गिक रंग म्हणून वापरली जाते. माल्टोडेक्सट्रिनसह कमी खर्चात उच्च गुणवत्तेची पावडर तयार करून स्प्रे ड्रायिंग ही सर्वोत्तम पद्धत आहे.
गर पावडर बनविण्याची कृती
१) ताज्या लाल ड्रॅगन फळांपासून रस काढणे.
२) फळांच्या रसामध्ये माल्टोडेक्सट्रिन (१८%) मिसळणे.
३) मिश्रणाचे एकसंधीकरण करावे.
४) स्प्रे ड्रायरने सुनिशित केलेला प्रवेश (१७० °C) आणि बाहेर (७० °C) तापमान स्थितीत १०-१२ तासांसाठी मिश्रण वाळवणे.
५) स्प्रे ड्राईड ड्रॅगन फळ पावडर नियंत्रित परिस्थितीत पॅकेजिंग आणि साठवण करणे.
- भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक स्ट्रैस प्रबंधन संस्थान
बारामती, पुणे, महाराष्ट्र
अधिक वाचा: सोयाबीन पिकातून जास्तीचा नफा मिळविण्यासाठी सोया प्रक्रिया उद्योगात कशा आहेत संधी