Join us

फळे, भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण पाहिजे इथे साधा संपर्क

By बिभिषण बागल | Published: July 26, 2023 4:09 PM

फळे व भाजीपाला बाजारभावातील चढउतार तसेच मोठ्या प्रमाणात आवक यामुळे फळे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, अशावेळी काढणीपश्चात प्रक्रिया फळे व भाजीपाल्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ आपण बनवू शकतो यासाठी शास्रोक्त प्रशिक्षण घेणे जरुरीचे आहे.

फळे व भाजीपाला बाजारभावातील चढउतार तसेच मोठ्या प्रमाणात आवक यामुळे फळे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, अशावेळी काढणीपश्चात प्रक्रिया फळे व भाजीपाल्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ आपण बनवू शकतो यासाठी शास्रोक्त प्रशिक्षण घेणे जरुरीचे आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागातर्फे ३७ वा फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती:

  • प्रशिक्षणाचा कालावधी : दि. ०१.०८.२०२३ ते ३१.०८.२०२३ (१ महिना)
  • शैक्षणिक पात्रता : कमीत कमी १० वी पास/नापास
  • प्रशिक्षण मूल्य रू.५,०००/- (पाच हजार रुपये मात्र)

सदर प्रशिक्षणामध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे प्रात्यक्षिके व बौध्दिकांचा समावेश राहील.अ. प्रात्यक्षिके१) फळांपासून रस, सरबत, स्कॅश तयार करणे२) फळांचा गर साठवणूक करणे३) फळाचा रस/गरा पासून टॉफी तयार करणे४) आवळा कॅन्डी तयार करणे५) जांभूळ/आवळा पावडर तयार करणे६) जॅम (पपई, अननस, आंबा, अंजीर) तयार करणे७) जेली तयार करणे८) वेफर्स (केळी व बटाटा) तयार करणे९) हिरव्या पालेभाज्या सुकविणे १० पपई पासून टुटीफ्रुटी तयार करणे११) कांदा काप वाळविणे१२) अनारदाणा तयार करणे१३) आवळा सुपारी तयार करणे१४) लोणचे तयार करणे१५) टोमॅटो केचप तयार करणे

ब) बौद्धिके१) मफुकृवि, राहुरी-एक दृष्टिक्षेप व इतर उपलब्ध प्रशिक्षण सेवा सुविधा२) फळे व भाजीपाला : आहारातील महत्व, अन्न विषबाधा आणि अन्न पदार्थापासूनचे धोके ३) फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग : कच्च्या मालाची निवड, वर्गवारी, कापणी, पॅकींग व साठवण४) प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक गुणवत्तापूर्व कच्च्या मालाचे निकष५) फळ प्रक्रिया तंत्रज्ञान : रस, गर, सरबत, स्कॅश६) फळ प्रक्रिया तंत्रज्ञान : जॅम, जेली, टॉफीज, मोरावळा, लोणची इ. फळ प्रक्रिया तंत्रज्ञान : आवळा कँडी, सुके अंजिर, मनुके, अनारदाना, भाजीपाला सुकविणे ८) कोरडवाहू फळेः प्रक्रिया व साठवणूक९) फळे व भाजीपाला प्रक्रिया युनिटसाठीची रचना, लागणारी मशिनरी व देखभाल मार्गदर्शन१०) प्रक्रिया पदार्थांचे गुणनियंत्रण, प्रमाणके आणि प्रक्रिया पदार्थांचे मार्केटिंग११) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अन्नपदार्थासंबंधी कायदे आणि प्रमाणके१२) अन्नप्रक्रिया प्रांगण (Food Park) : संकल्पना१३) प्रक्रिया युनिटचे प्रकार, सुविधा व विविध सवलती१४) प्रक्रिया पदार्थ निर्मिती संबंधी आर्थिक बाबी व विपणन१५) फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे व्यवस्थापन१६) प्रक्रिया उद्योगातील अन्न भेसळ आणि त्यासंबंधीचे प्रतिबंधात्मक कायदे१७) प्रक्रिया उद्योगातील प्रक्रिया पदार्थांचे पॅकिंग साहित्य, पॅकेजिंग प्रणाली व निर्यात१८) लघुउद्योगाची नोंदणी व व्यवस्थापन१९) प्रकल्प अहवाल तयार करणे२०) प्रक्रिया उद्योग आणि बचत गटांचे महत्व२१) प्रक्रियायुक्त पदार्थांचे मार्केटींग व्यवस्थापन२२) लघु उद्योग सुरु करताना येणा-या अडचणी, समस्या व त्यावर उपाययोजना२३) प्रक्रिया युनिटचे व्यवस्थापन२४) शासकिय कर्ज, अनुदाने व बँक प्रस्ताव२५) प्रक्रिया उद्योगासंबंधी शासकीय योजना

प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी मा. प्रमुख, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी जि. अहमदनगर या कार्यालयाशी (०२४२६) २४३२५९ तसेच कार्यालय प्रतिनिधी श्री. राहुल घुगे ९४२१४३७६९८ यांचेशी त्वरीत संपर्क साधून नाव नोंदणी करावी.

प्रशिक्षणासंबंधी सुचना / नियम व अटी१. फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचे ठिकाण अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, मध्यवर्ती परिसर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी ता. राहुरी जि. अहमदनगर येथे राहील.२. प्रशिक्षणार्थ्यांनी येताना पासपोर्ट आकाराचे तीन फोटो, आधारकार्ड आणि शैक्षणिक कागदपत्रांचे झेरॉक्स घेवुन यावे.३. प्रशिक्षणार्थ्यांनी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, मफुकृवि, राहुरी या कार्यालयात दि. १ ऑगस्ट रोजी प्रशिक्षण शुल्क रोखीने रु. ५०००/- ( पाच हजार रुपये मात्र) भरुन नाव नोंदणी करावी व पावती घ्यावी.४. प्रशिक्षणाचा कालावधी दि.१.८.२०२३ ते ३१.८.२०२३ असेल.५. प्रत्येक शनिवार व रविवार तसेच इतर शासकीय सुटींचा त्यात समावेश राहील. परंतू बहिस्थ तज्ञ यांची बौध्दीके, प्रात्यक्षिके तसेच प्रकल्प भेट ( सहल) तज्ज्ञांच्या उपलब्धतेनूसार सुटीच्या दिवशी देखील याचे आयोजन होऊशकते.६. प्रशिक्षणाची वेळ स.१०.०० ते १.०० व दु. २.०० ते ५.०० राहील.७. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील. पुर्ण उपस्थिती असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनाच प्रमाणपत्र (आधारकार्ड वरील नावानुसार) दिले जाईल.८. प्रशिक्षणा दरम्यान विद्यापीठातील अतिथीगृहात प्रशिक्षणार्थ्यांना राहण्याची व भोजनाची सोय उपलब्ध करुन दिली जाईल परंतू त्याचे शुल्क प्रशिक्षणार्थ्यांना स्वतः द्यावे लागेल.९. स्थानिक प्रशिक्षणार्थ्यांना प्रवास, ये-जा स्वतः च्या जबाबदारीवर करावा लागेल.१०. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थ्याना शिस्तीचे व सांगितलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.

अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी जि. अहमदनगर(०२४२६) २४३२५९श्री. राहुल घुगे ९४२१४३७६९८ 

टॅग्स :शेतीफळेभाज्यापीकविद्यापीठ