फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) नुसार फूड बिझनेस ऑपरेटर (FBOs) अन्नाशी संबंधित व्यवसाय व प्रक्रिया उद्योग उपक्रमांमध्ये गुंतलेली कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.
उत्पादन (Manufacturing), प्रक्रिया (Processing), पॅकेजिंग (Packaging), स्टोरेज (Storage), वाहतूक (Transportation), वितरण (Distribution), आयात (Imports), अन्न सेवा (food services), अन्नाची विक्री (Sale of food) आणि अन्न घटकांची विक्री (Sale of food ingredients) इ.
वैध अन्न परवाना किंवा नोंदणीशिवाय उपरोक्त अन्न व्यवसाय व प्रक्रिया उद्योगात कार्य करणे हा FBOs करिता दंडनीय गुन्हा आहे.
FSSAI परवाना किंवा नोंदणीचा प्रकार
FSSAI नुसार अन्न व्यवसाय व प्रक्रिया उद्योजक/उद्योग यांना परवाना किंवा नोंदणी करताना त्यांच्या व्यवसायाचा प्रकार, वार्षिक उलाढाल आणि उत्पादनाची क्षमता यावर आधारित आहे.
FSSAI ने फूड सेफ्टी कम्प्लायन्स सिस्टम (FoSCOS) ही अन्न परवाने व नोंदणी प्रणाली (फूड लायसन्सिंग आणि रजिस्ट्रेशन सिस्टीम (FLRS)) निर्माण केली असून यांमार्फत देशभरातील FBO's ला आपला व्यवसाय व प्रक्रिया उद्योगाची नोंदणी करता येते.
कशी कराल नोंदणी?
१) FOSCOS च्या https://foscos.fssai.gov.in/ऑनलाइन पोर्टलवर परवाना प्राप्त करणेसाठी अर्ज करू शकतात.
२) परवाने व नोंदणीची प्रक्रिया https://foscos.fssai.gov.in/ऑनलाइन पोर्टलवर जाऊन New License/Registration क्लिक करणे.
३) अन्न व्यवसाय व प्रक्रिया उद्योजक/उद्योग कोणत्या वर्गवारीत मोडतो त्यानुसार क्लिक करणे
४) राज्य निवडणे, व्यवसायाचा प्रकार निवडणे (प्रत्येक गटातून एकाधिक निवड केली जाऊ शकते) इ. प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
५) अन्न व्यवसाय व प्रक्रिया उद्योजक/उद्योग नोंदणी पूर्वी https://foscos. fssai.gov.in/ या ऑनलाइन पोर्टलचा अभ्यास करून आवश्यक व बंधनकारक असलेली कागदपत्रे तयार ठेवावी.
६) परवान्यासाठी अर्ज करताना सामान्य मार्गदर्शक तत्त्वेः जसे कि स्वयं-साक्षांकित असेलेले छायाप्रत दस्तऐवज आवश्यक आहे.
७) अद्ययावत केलेले दस्तऐवज जमा करणे,खोटी माहिती न देणे, पात्रता असलेले दस्तऐवज जमा करणे अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
८) उत्पादन मानके आणि नियम समजून घेणे, प्राधिकरणाकडून आवश्यक दस्तऐवज मागणी केल्यास अशा दस्तऐवजाची पूर्तता लवकरात लवकर करणे यामुळे प्रक्रिया जलद होईल.
अर्ज करतांना काही शंका/अडचणी आल्यास FOSCOS च्या हेल्पलाइन नंबर क्र. १८०० ११२ १०० किंवा foscosfssai.gov.in हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता.
प्राधिकरणामार्फत अन्न व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांना ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या अर्जानुसार १ ते ५ वर्षाकरीता परवाना/नोंदणी मिळू शकते. परवाना व नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी १ महिना अगोदर परवाना अथवा नोंदणीचे नुतनीकरण करणे कायद्याने बंधनकारक आहे.
सर्व अन्नप्रक्रिया उद्योगांनी अन्न सुरक्षा व मानक नियमन (परवाना व नोंदणी) २०११ अंतर्गत परिशिष्ट ४ मध्ये नमुद केलेल्या सर्व अटींचे पालन करणे व कायद्याने दिलेल्या मानक व तरतुदीनुसार चांगल्या व उत्तम दर्जाचे, सुरक्षित अन्न पदार्थ उत्पादीत करणे व त्याची विक्री करणे बंधनकारक आहे.
अधिक वाचा: Udyog Aadhar : उद्योग आधार काढण्यापूर्वी ह्या १० गोष्टी माहित असणे आवश्यक