Join us

ज्वारीचे उपपदार्थ करून मिळवा अधिकचा नफा; ज्वारीचे मूल्यवर्धन व पोषणमूल्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 12:09 PM

शेतात विविध धान्य पिकविले जातात. मात्र ऐन बाजारात विक्री करत्या वेळी शेतमालाला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल होतो. अशा वेळी शेतमालाचे मूल्यवर्धन केल्यास त्यातून अधिकचा नफा मिळविता येतो. 

शेतात विविध धान्य पिकविले जातात. मात्र ऐन बाजारात विक्री करत्या वेळी शेतमालाला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल होतो. अशा वेळी शेतमालाचे मूल्यवर्धन केल्यास त्यातून अधिकचा नफा मिळविता येतो. 

याच अनुषंगाने जाणून घेऊया ज्वारीचे मूल्यवर्धित पापड आणि त्याचे पोषणमूल्य. ज्वारी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक धान्य आहे, ज्यामध्ये प्रथिने, तंतू, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. अलीकडे ज्वारीला मागणी वाढल्याने त्याचे मूल्यवर्धन करून विक्री करणे निश्चितच फायद्याचे आहे.

ज्वारीचे पापड करण्यासाठी लागणारे साहित्य

• ज्वारीचे पीठ - २ कप• जिरे - १ चमचा• मीठ - चवीनुसार• तिखट - १ चमचा• हिंग - १/२ चमचा• पाणी – आवश्यकतेनुसार

ज्वारीचे पापड करण्याची कृती

• ज्वारीचे पीठ एका भांड्यात घ्या.• त्यात जिरे, मीठ, तिखट आणि हिंग घाला.• थोडे-थोडे पाणी घालून पीठ मळा. पीठ मऊ आणि एकसंध होईल असे मळा.• पीठ मळल्यानंतर त्याचे लहान-लहान गोळे तयार करा.• प्रत्येक गोळ्याला लाटून पातळ पापड तयार करा.• तयार पापड एका स्वच्छ कपड्यावर ठेवा आणि उन्हात वाळवायला द्या.• पापड चांगले वाळल्यानंतर ते एका हवाबंद डब्यात साठवा.

टीप : ज्वारीच्या पापडांना तळून किंवा भाजून खाण्यासाठी वापरता येते. ते चटणी, सॉस किंवा कोणत्याही भाजीबरोबर खाल्ल्यास स्वादिष्ट लागतात.

ज्वारीच्या पापडाचे व ज्वारीचे पोषणमूल्य

कॅलरीज : १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः ३४९ कॅलरीज असतात.प्रथिने : १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः १०.६ ग्रॅम प्रथिने असतात.चरबी : १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः १.९ ग्रॅम चरबी असते, ज्यामध्ये संतृप्त चरबीची मात्रा खूप कमी असते.कार्बोहायड्रेट्स : १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः ७२.६ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात.तंतू : १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः ६.७ ग्रॅम तंतू असतात, जे पचनासाठी अत्यंत उपयुक्त असतात.खनिजे : कॅल्शियम: १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः २५ मिलिग्रॅम कॅल्शियम असतो.लोह : १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः ४.१ मिलिग्रॅम लोह असतो.मॅग्नेशियम : १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः १६५ मिलिग्रॅम मॅग्नेशियम असतो.फॉस्फरस : १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः २८७ मिलिग्रॅम फॉस्फरस असतो.पोटॅशियम : १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः ३७७ मिलिग्रॅम पोटॅशियम असतो.विटामिन्स : विटामिन बी१ (थायामिन): १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः ०.३३ मिलिग्रॅम विटामिन बी१ असतो.विटामिन बी३ (नायसिन) : १०० ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः २.१ मिलिग्रॅम विटामिन बी३ असतो.

अशा प्रकारे ज्वारीचे पापड तयार करून ज्वारी शेतमालाचे मुलयावर्धन केल्यास शेतकर्‍यांना नक्कीच आर्थिक हातभार मिळू शकतो. आकर्षक पॅकिंग सह बाजारात याची सहज विक्री करणे शक्य आहे.   

डॉ. सोनल रा. झंवरसहाय्यक प्राध्यापक एम. जी. एम अन्नतंत्र महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर. 

हेही वाचा - जांभूळ खाऊन बिया फेकत असाल तर थांबा ? जांभूळ बिया आहेत आरोग्यास जांभळापेक्षा अधिक फायद्याच्या

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीज्वारीअन्नबाजार