शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. फलोत्पादन हा शेतीला अधिक मूल्यवर्धन ठरणारा व्यवसाय ठरु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत फलोत्पादन पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते. फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे.
योजेनचा उद्देश काय?
मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या फलोत्पादन उत्पादनाचे बाजार नियंत्रण करणे. फलोत्पादित, औषधी व सुगंधी वनस्पती पिकांचा दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे. बाजारपेठेमध्ये फलोत्पादित औषधी व सुगंधी वनस्पतींच्या पुरवठयात सातत्य ठेवणे. ग्राहकाला आवडीप्रमाणे सातत्याने चांगल्या दर्जाच्या मालाचा पुरवठा करणे. फलोत्पादित, औषधी व सुगंधी वनस्पतीचा टिकाऊपणा वाढविणे.
कुणाला मिळू शकतो लाभ?
शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, शासन मान्य संस्था, सहकारी संस्था यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल. वैयक्तिक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.
काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत आकारमान निहाय देय अनुदान कसे असेल?
पॅक हाऊस (Pack House) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 4.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मी. X 6 मी.असे राहील. देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 % (रु. 2.00 लाख) असे असेल.
एकात्मिक पॅक हाऊस कन्व्हेअर बेल्ट,संकलन व प्रतवारी केंद्र, वॉशिंग व ड्राईंग यार्ड आणि भारत्तोलन, इ. सुविधांसह (Integrated pack house with facilities for conveyer belt, sorting, grading units, washing) या साठी अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 50.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मी. x 18 मी.,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 17.50 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 25.00 लाख) असे असेल.
पुर्व शितकरण गृह अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 25.00 लाख / प्रति युनिट,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,
35 टक्के (रू. 08.75 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 12.50 लाख) असे असेल.
शितखाली (स्टेजिंग) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रु. 15.00 लाख प्रति युनिट,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 05.25 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 07.50 लाख) असे असेल.
नवीन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळी आधुनिकीकरण अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 250.00 लाख,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 87.50 लाख)डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 125.00 लाख) असे असेल.
शितवाहन अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू.26.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मे. टन ,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 09.10 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 13.00 लाख) असे असेल. रायपनिंग चेंबर (Ripening Chamber)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 1.00 लाख प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता 300 मे. टन,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण, 35 टक्के, डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के असे आहे.
शितगृह (नविन)
अ) नविन शितगृह युनिट प्रकार- 1 (एक सारख्या तापमानात राहण्याऱ्या उत्पादनासाठी) (प्रति चेंबर 250 टन),अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 8000 प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण, 35 टक्के जास्तीत जास्त रु. 140.00 लाख,
डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के जास्तीत जास्त रु. 200.00 लाख असे आहे.
ब) शितगृह युनिट प्रकार- 2 (एकापेक्षा अधिक उत्पादने व तापमानासाठी) कमीत कमी 6 चेंबर्स पेक्षा जास्त (प्रति चेंबर 250 टन) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 10,000 प्रति मे.टन, बांधकाम क्षेत्र / क्षमता रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी ,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के जास्तीत जास्त रु. 175.00 लाख,डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र,50 टक्के जास्तीत जास्त रु. 250.00 लाख असे आहे.
क) शितगृह युनिट प्रकार-२ (नियंत्रण वातावरणासाठी नविन तंत्रज्ञान राबविणे)
अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 10,000 प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण 35 टक्के जास्तीत जास्त 175.00 लाख, डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र, 50 टक्के जास्तीत जास्त 250.00 लाख असे आहे.
एकात्मिक शीतसाखळी कार्यपध्दती अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम 6 लाख रुपये, बांधकाम क्षेत्र / क्षमता प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी घटक क्र. 1 ते 8 मधील किमान 2 घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे.देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण 35 टक्के (रू. 210.00 लाख)डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र, 50 टक्के (3 लाख) आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी
शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.
योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ :- http://krishi.maharashtra.gov.in, http://mahanhm.in किंवा नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.