Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > कापूस प्रक्रिया हब, तरुणांचा प्रक्रिया उद्योगाकडे वाढता कल 

कापूस प्रक्रिया हब, तरुणांचा प्रक्रिया उद्योगाकडे वाढता कल 

Latest News Increasing trend of youth towards cotton processing industry | कापूस प्रक्रिया हब, तरुणांचा प्रक्रिया उद्योगाकडे वाढता कल 

कापूस प्रक्रिया हब, तरुणांचा प्रक्रिया उद्योगाकडे वाढता कल 

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा परिसरात कापूस प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात जोर धरू लागला आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा परिसरात कापूस प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात जोर धरू लागला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

धुळे, जळगाव जिल्ह्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र गेल्या काही वर्षात कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने आता येथील शेतकरी प्रक्रिया उद्योगाकडे वळू लागला आहे. कापूस प्रक्रिया उद्योगासह कापसाच्या गाठी चीन, व्हिएतनाम सारख्या देशात निर्यात होत असल्याने धुळे प[जिल्ह्यातील बहुतांश भागात कापूस प्रक्रिया उद्योगाचे हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. 
                 
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा परिसरात कापूस प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात जोर धरू लागला आहे. कोरडवाहू शेती हाच प्रमुख येथील व्यवसाय. पण गेल्या काही वर्षांत सिंचनाचे प्रमाण वाढल्याने शेती वाढली. आता ९०- ९५ टक्के शेतकरी मनी क्रॉप म्हणून कापूस हेच प्रमुख पिक घेतात. याच अनुकूलतेचा फायदा घेत दुरदृष्टी ठेवून काही तरुण उत्साही उद्योजकांनी पुढाकार घेऊन नजिकच्या काळात परिसरात कापूस प्रक्रिया उद्योगांची पायाभरणी केली. या सर्व उद्योगांची उभारणी भागीदारी तत्त्वावर झाली आहे. या सर्व ग्रामीण उद्योगांतून वार्षिक सरासरी ४५० कोटी रुपयांची उलाढाल होते. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या एक हजारावर लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

शिंदखेडा शहरातील तरुण उद्योजकानी कापूस प्रक्रिया उदयोग सुरू केला आहे. शेतकऱ्यांकडून थेट कापूस घेतला जात असल्याने शेतकऱ्यांना ही मालाच्या प्रत नुसार भाव मिळत असल्याने, शिवाय एकच वजन होत असल्याने काटा मारणे, पैसे बुडण्याची भीती नसल्याने शेतकरीही समाधानी आहेत. यात स्टेशन एरियात असलेले वर्धमान कोटेक्स व पुष्पक ऑइल इंडस्ट्रीज गिरीश टाटीया, रोशन टाटीया व इतर यांनी बँकेतून 25 कोटी भागभांडवल उभे करून कापूस प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. त्यांची वार्षिक उलाढाल कापसाच्या गाठी, ढेप, ऑइल मिळून वार्षिक उलाढाल 370 कोटी आहे. त्यांना दररोज 2 हजार क्विंटल कापसापासून 400 गाठी मिळत आहेत. त्यांच्या कापसाच्या गाठी देशासह परदेशात चीन, व्हिएतनाम, बांगलादेश इथे निर्यात होत आहेत. तसेच ढेप गुजरात, राजस्थान आदी ठिकाणी निर्यात होत आहे. शेतकऱ्यांना तुलनेने मालाचा जास्त मोबदला, सुरक्षितरित्या पैसे मिळू लागले आहेत. 

कापूस प्रक्रिया उद्योग बहरला. 
     
नुकतेच आशापुरी जिनिग येथील सुशिक्षित तरुणांनी देखील कापूस प्रक्रिया उद्योग उभारले आहेत. एकूण 550 कोटींची उलाढाल या उद्योगातून होत असून यात प्रत्यक्ष 1 हजार कामगारांना रोजगार मिळाला आहे. त्यात अप्रत्यक्षपणे या उद्योगाला पूरक असे ढेप, तेल, वाहतूक आदींसाठीही रोजगार उपलब्ध झाला आहे. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने बाहेर राज्यातून व जिल्हयातून कापुस विकत आणावा लागत आहे. याचा परिणाम या उद्योगांवर झाला असून येत्या वर्षात यात वाढ होण्याची श्यक्यता आहे. 

Web Title: Latest News Increasing trend of youth towards cotton processing industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.