Kairi Panha : कैरीचं पन्ह हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांपैकी सर्वांचं आवडत शीतपेय आहे. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे पन्हे उन्हाळ्यात (Summer) आपल्याला उष्माघातापासून दूर राहण्यास मदत करते.
कैरी, आंबा यांसारख्या फळांचं (Mango Panha) आकर्षण जेवढं असतं, तेवढंच आकर्षण त्यांच्यापासून बनविलेल्या पदार्थांचं असतं. कच्च्या आंब्याचं सरबत केवळ स्वादिष्ट नसतं, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतं. विशेषतः उन्हाळ्यात कच्च्या आंब्याचं पन्ह (Amba Panha) फायद्याचे ठरते.
साहित्य : १. कच्च्या कैऱ्या - ६ ते ८ २. साखर - २ कप ३. पाणी - २ कप ४. पुदिन्याची पाने - १०० ग्रॅम ५. जिरे - २ टेबलस्पून ६. काळे मीठ - १ टेबलस्पून ७. सैंधव मीठ / साधे मीठ - १ टेबलस्पून
कृती :
- सर्वप्रथम कच्च्या कैरीच्या साली काढून सगळ्या कैऱ्या सोलून घ्याव्यात.
- आता या कच्च्या कैऱ्यांचे लहान लहान तुकडे करावेत.
- त्यानंतर एका कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात या कैऱ्यांचे लहान तुकडे, पाणी, साखर घालून कुकरच्या २ शिट्ट्या काढून शिजवून घ्यावेत.
- आता मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, जिरे, पाणी घालून त्याची पातळसर पेस्ट करुन घ्यावी.
- कुकरमधील मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर, हे मिश्रण गाळणीत ओतून, गाळणीने गाळून घ्यावे.
- उष्माघातापासून संरक्षण : उन्हाळ्यात शरीराचं तापमान वाढतं, त्यामुळे उष्माघात (लू) होण्याची शक्यता असते.
- पन्ह शरीराला थंडावा देऊन उष्माघातापासून वाचवतं.
- शरीराला थंडावा देते : हे नैसर्गिक थंड पेय असून शरीरातील उष्णता कमी करतं उन्हाळ्यात फ्रेश वाटायला मदत करतं.
- उत्तम जलतृष्णा निवारण : हे शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवतं आणि डिहायड्रेशनपासून वाचवतं.
- पचनासाठी उपयुक्त : पन्ह पचनक्रिया सुधारते आणि अपचन, मळमळ यासारख्या त्रासांवर आराम देते.
- लघवी साफ करते : कच्च्या आंब्यात मूत्रल गुणधर्म असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करीत असतात.