Mirchi Pickle : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) रांजणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषी तंत्र विद्यालयात शेतमाल प्रक्रिया उद्योग तसेच शेतीपूरक स्वयंरोजगार अंतर्गत विद्यार्थ्यांना लिंबू व हिरवी मिरची (Green Chilly) यांचे मिश्र लोणचे तयार करण्याविषयी प्राचार्य प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शनात संगीता वसावे यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
यात लिंबू व हिरवी मिरची यांचे मिश्र लोणचे (Mix Pickle) तयार करण्यासाठी ७५० ग्रॅम लिंबू व २५० ग्रॅम हिरवी मिरची वापरावी. हे प्रमाण चवीनुसार व आवडीनुसार कमी जास्त करावे. लोणचे तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली, पिवळसर रंगाची व मोठ्या आकाराची फळे निवडावीत. तसेच मिरची चांगल्या प्रतीची असावी.
घटक पदार्थाचे प्रमाण
लिंबू ७५० ग्रॅम, हिरवी मिरची २५० ग्रॅम, मीठ २५० ग्रॅम, हळद पावडर ५ ग्रॅम, मेथ्या १० ग्रॅम, मोहरी डाळ ५० ग्रॅम, हिंग पावडर २५ ग्रॅम, तेल २०० ते २५० मि.लि.
कृती कशी करावी?
- सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवुन पुर्ण कोरड्या करुन मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या.
- तसेच २ लिंबाच्या ८ फोडी करुन घ्या.
- मोहोरीची डाळ किंचीत गरम करुन घ्यायची, म्हणजे काही दमटपणा असेल तर जातो.
- गॅस बंद करुन त्यात मेथी पावडर घालुन एकत्र मिश्रण करायचे.
- मिरचीचे तुकडे, लिंबाच्या फोडी एकत्र करुन मिठ घालुन अगदी ५ मिनीटे ठेवायचे.
- त्यात वरील मसाला एकत्र करुन मिसळुन घ्यायचे.
- यानंतर १ चमचा हळद घालायची.
- दोन लिंबाचा रस काढुन घेऊन तो मिश्रणात टाकायचा.
- त्यानंतर थंड झालेली फोडणी घालायची.
- अशा पद्धतीने थंडीमध्ये लिंबू मिरचीचे लोणचं बनवता येईल .
Ration Card Update : तुम्हाला रेशनकार्डवरील नाव कमी करायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया