Unhali Valvan : उन्हाळा कशासोबत जोडता येतो? उकाडा इत्यादी आहेच, पण सर्वात मुख्य म्हणजे शेती आणि स्वयंपाकघरातील कामे. आज हजार प्रकारची लोणची आणि मसाले वाट्टेल तेव्हा मिळण्याच्या जमान्यात देखील भारतात (Indian Culture) जवळपास ८० टक्के घरांत उन्हाळी वाळवण सुरू होते, हे खरेच विशेष आहे. तुमची समजूत असेल की वाळवण म्हटलं की त्यात फक्त पापड इत्यादी पदार्थच असतात, तर है चूक आहे.
उन्हाळी वाळवण (Unhali Valvan) यावर एक ग्रंथ होईल, इतके वैविध्य भारतातील वाळवण प्रकारात मिळेल, वाळवणाचे हे प्रकार बघितले की आपली याबाबतची समजही नक्कीच व्यापक होईल. भारतात ब्रिटिश आले ते मसाल्यांसाठी आणि आजही मसाले हा भारतीय घराचा केंद्रबिंदू, हजारी प्रकारचे मसाले घराघरांत होतात. अंगण नसेल तर बाल्कनी, गच्ची कुठेही मिरच्या सुकू लागतात. जोडीला बटाटा कीस, साबुदाणा चकली, पापड, कुरडया, शेवया (Shevaya, Kurdaya) असे अगणित पदार्थ उन्हाळ्यात वाळवण म्हणून केले जातात.
पूर्वी दळणवळणाची साधने कमी होती. अनेक ठिकाणी पावसाळ्यात, चार-चार दिवस घरातून निघता येत नाही, अशी परिस्थिती असायची. त्यासाठी अन्नसाठा हवा, म्हणून मग माणसाने अगदी भाज्या पण सुकवायला सुरुवात केली. कारली, गवार, मेथी, पालक, पडवळ असा भाज्या कडक उन्हात सुकवल्या जातात. अनेक राज्यांत भोपळा, सोयाबीन, मूगडाळ यांचे सांडगे करतात. पावसाळ्यात भाजीला पर्याय असतो हा. चिंच गोळे मीठ लावून निवांत सुकत असतात. बाजूला कैरी असते, आंब्याचे, फणसाचे साठ दिसते.
नेहमीच्या डाळी, कडधान्य असतातच. खासकरून कोकणपट्टीत तर अधिकच, कडब्या वालावर माती लावून सात दिवस त्यांची अग्निपरीक्षा होते. खरवस ही अपूर्वाईची गोष्ट. सहज मिळत नाही. तेव्हा खरवस सहज आणि हवा तेव्हा उपलब्ध व्हावा, यासाठी कोकणातील हुशार सुगरणी स्वच्छ पंचे चिकाच्या दुधात पूर्ण भिजवून कडकडीत वाळवायच्या, पहणारे धेव पण कपत्यावर घ्यायच्या कड़कतीत वाळले की, साठवून ठेवायचे, खरवस करायचा असला की ते नारळ दुधात बुडवले की खरवस तयार, ही कौशल्ये खरेच वाखाणण्याजोगी. जगातली, त्यातही भारतातली अगणित वाळवणे बायकांच्या धोरणी डोक्यातून उपजलेली आहेत.
बेगमी आणि आर्थिक सोय
वाळवणामागील अर्थकारण पैशांचे आहे. केवळ वाळवण परंपरेवर छोटे मोठे उद्योग उभे राहिले आहेत. आधी ताटाची मोय म्हणून केली जाणारी वाळवणं आता घर चालविण्यासाठी आर्थिक स्रोतही झाली आहेत. आता काहीही, कधीही, कुठेही उपलब्ध असते तरीही वाळवण मात्र सुटलेले नाहीये. यात निसर्गसंपदेचा पुरेपूर वापर हाही उद्देश असतो. विशेषतः गाव खेोडी इथे तर वाळवणे हमखास होतातच.
आदिवासी समाज त्यांचा पावसाळा वाळवणावर काढतो. ऊसतोडणी, रस्ता बांधकाम अशा मजुरोव्या पालावर, तरट टाकून भात, डाळ, भाजी वाळवताना मी अनेकदा पाहिली आहे. वैशाखात लग्न इत्यादी प्रसंगी रागड उरलेले अन्न वाळवून साठवतात. पावसाळ्यात काम बंद असते त्यासाठी, बारकी पोरे राखण करत असतात. दया पवार यांच्या 'बलुतं पुस्तकात वाळवणाचा बिदारक उल्लेख आहे. त्यातील चान्या पदार्थ कायम आठवणीत राहिलाय. भूक आर्थिक स्तर पाहत नाही. येणारे दिवस कसे असतील कल्पना नसते, त्यासाठी माणूस मग पंचमहाभूतांना असा कामाला लावतो, ती कुडी तगवण्यासाठी.
- शुभा प्रभू साटम, लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक