चिखली : खरीप व रबीसाठीच्या बीजोत्पादनात बुलढाणा जिल्हा राज्यात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. यामध्ये सर्वांत अग्रेसर तालुका म्हणून चिखलीची गणना होत असून बीजोत्पादनासह प्रक्रिया केंद्रांमुळे तालुक्याला आता 'सीड हब' म्हणूनही ओळख मिळाली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनीही समृद्धीची कास धरली आहे.
बीजोत्पादनात राज्यात अग्रेसर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात सद्य:स्थितीत 11 हजार हेक्टर बीजोत्पादनाचे क्षेत्र आहे. यामध्ये एकट्या चिखली तालुक्याचा वाटा हा ६ हजार 648.20 हेक्टर आहे. म्हणजेच जिल्ह्यातील एकूण बीजोत्पादन क्षेत्रापैकी अर्ध्यापेक्षा जास्त वाटा हा चिखली तालुक्याचा आहे. तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद, कांदा, कपाशीच्या बीजोत्पादनाचे क्षेत्र अधिक आहे. यासह मिरची, टोमॅटो आदी भाजीपालावर्गीय पिकांचेही बीजोत्पादन घेतले जाते. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
दरम्यान, चिखली महाबीजचे महत्त्वाचे केंद्र असल्याने त्याचाही फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे. सोबतच तालुक्यातील बीजोत्पादन आणि याकडे वर्षागणिक वाढणारे शेतकरी पाहता विविध बियाणी कंपन्यांचीही येथे पाळीमुळे खोलवर रुज. ली आहेतदरम्यान पारंपारिक पिकांपेक्षा शेडनेट, पॉलिहाऊस सह खुल्या पद्धतीचे बीज उत्पादन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. बाजारभावाच्या तुलनेत बीजोत्पादनातून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला 25 टक्के अधिक मोबदला मिळत असल्याने याद्वारे शेतकरी देखील आर्थिक प्रगती साधताना दिसून येत आहेत. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.
आठ हेक्टरवर कांदा बीज उत्पादन
दरम्यान चिखली तालुक्यात बिजोत्पादनाचे एकूण क्षेत्र 6 हजार 648.20 हेक्टर तर उत्पादन 97 हजार 175 क्विंटल आहे. या बीजोत्पादनातून सुमारे 98 कोटींची उलाढाल एकट्या चिखली तालुक्यात होत असल्याचा समोर आले आहे. दरम्यान आशिया खंडात सर्वाधिक कांदा बीजोत्पादन करणारा तालुका म्हणून चिखली तालुक्याने गतकाळात ओळख मिळवली होती. मात्र अत्यंत नाजूक समजला जाणाऱ्या पिकास राजाश्रय न मिळाल्याने आणि दरातही सातत्याने घसरण होत गेल्याने कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांनी इतर बीजोत्पादनाकडे आपला मोर्चा वळवला असून आज घडीला केवळ आठ हेक्टरवर कांदा बीज उत्पादन घेतले जाते.
अशी आहे सद्यस्थिती
दरम्यान चिखली तालुक्यातील बीजोत्पादनाची स्थिती पाहिली असल्यास या तालुक्यात 14 सीड प्रोसेसिंग प्लांट असून 37 फार्मर प्रोडूसर कंपनी कार्यरत आहेत तर 89 शेडनेट असून तीन पॉलिहाऊस आहेत. तर बीजोत्पादन क्षेत्र आणि उत्पादन आकडेवारी पाहिल्यास सोयाबीन कंपनी 4683 हेक्टर मध्ये लागवड केली आहे तर जवळपास 70,250 क्विंटल मध्ये उत्पादन झाला आहे तर सोयाबीन महाबीज मध्ये 19 हेक्टर मध्ये लागवड झाली आहे. तर 26500 क्विंटल मध्ये उत्पादन झाला आहे 2.20 हेक्टर मध्ये मूग लागवड केली असून 15 क्विंटल पर्यंत उत्पादन झाला आहे. 8 हेक्टर मध्ये कांदा लागवड झाली असून 60 क्विंटल पर्यंत उत्पादन झाला आहे40 हेक्टर मध्ये कपाशीची लागवड करण्यात आली असून 250 क्विंटल पर्यंत उत्पादन झाला आहे. पंधरा हेक्टर मध्ये उडीद लागवड केली असून 100 क्विंटल पर्यंत उत्पादन झाला आहे.