Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > हळदीचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यातील संधी

हळदीचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यातील संधी

Opportunities in turmeric processing | हळदीचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यातील संधी

हळदीचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यातील संधी

प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. अन्नपचनासाठी पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी हळद औषधी आहे. हळदीच्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची ओळख पाहूया.

प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. अन्नपचनासाठी पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी हळद औषधी आहे. हळदीच्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची ओळख पाहूया.

शेअर :

Join us
Join usNext

प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. अन्नपचनासाठी पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी हळद औषधी आहे. हळदीच्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची ओळख पाहूया. शेतकरी घरगुती स्तरावर ही उत्पादने बनवू शकतात. आणि लघु व्यवसाय करू शकतात.

हळदीचे मूल्यवर्धित पदार्थ
हळद पावडर

हळद पावडर तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या हळदीचा वापर केला जातो. हळद पावडर तयार करण्यासाठी प्रथम जाड, मोठ्या हळकुंडांचा इलेक्ट्रिक मोटारीवर चालणाऱ्या चक्कीवजा मशीनमध्ये भरडा केला जातो. मशीनमध्ये भरडा पुढे जाऊन हळद पावडर तयार केली जाते ही पावडर वेगवेगळ्या आकाराच्या/मेशच्या जाळ्यांतून बाहेर पडून शेवटी ३०० मेष जाळीमधून बाहेर पडते. तयार पावडर ५, १०, २५ किलो आकाराच्या प्लॅस्टिक किंवा कापडी पिशवीमध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविली जाते.

कुरकुमीन
वाळलेल्या हळद पावडरपासून इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढता येतो. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातिपरत्वे २ ते ६ टक्के इतके असते. कुरकुमीनपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तसेच अनेक सौंदर्य प्रसाधने बनविता येतात.

कुंकू
हळदीचे गड्डे मुख्यतः कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये टॅपिओका किंवा पांढऱ्या चिकणमातीचे खडे मिसळतात आणि त्यावर सल्फ्युरिक अॅसिड व बोरिक अॅसिडची प्रक्रिया करतात. हे मिश्रण वाळवून दळून काढले जाते. अशा प्रकारे हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे आहेत.

रंगनिर्मिती
लोकरी, रेशमी, सुती कपड्याला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. सध्या काही प्रमाणात सुती कपड्यांना हळदीचा रंग देतात. औषधे उद्योगात हळदीचा रंगासाठी उपयोग होतो. वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होतो.

अधिक वाचा: आवळा प्रक्रिया उद्योगातील संधी; सुरु करा प्रक्रिया उद्योग

सौंदर्यप्रसाधने
सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी ज्या आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड उपयुक्त ठरते, त्यामध्ये हळदीचा वाटा आहे. वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये तसेच साबणांमध्ये हळदीच्या गुणधर्माचा उपयोग केलेला आढळतो. स्नानापूर्वी चेहऱ्याला व शरीराला हळद लावल्यास त्वचेला चकाकीपणा येतो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.

सुगंधी तेल
हळद ही मुळातच औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून सुगंधी तेल काढता येते. हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून ५ ते ६ टक्के तेल मिळते. हे तेल नारंगी-पिवळ्या रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.

ओलीओरिझीन निर्मिती
हळदीच्या भुकटीपासून आलेओरिझीन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेने प्रमाणित केली आहे. रंग व स्वादासाठी त्याचा उपयोग औषधे व खाद्यपदार्थांमध्ये करतात म्हणून चांगली मागणी आहे. याचे शेकडा प्रमाण ५ ते ७ टक्के असून त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाण १८ ते २० टक्के आहे.

औषधे तयार करण्यासाठी
आयुर्वेदात हळदीचे गुण सांगितले आहेत. औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात. हळद ही पाचक, कृमिनाशक, शक्तिवर्धक व रक्त शुद्ध करणारी आहे. मूत्राशयाच्या तक्रारी, मुतखड्यासाठी हळदीचा उपयोग होतो. हळदीचे तेल अॅन्टीसेप्टिक आहे. हळदीचे असे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

हळद संशोधन योजना
कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली

Web Title: Opportunities in turmeric processing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.