टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. भारतामध्ये टोमॅटो लागवडी खालील क्षेत्र ४५ हजार हेक्टर असून उत्पन्न १५ हजार टन इतके आहे. भारतातील आंध्रप्रदेश हे राज्य सर्वात जास्त टोमॅटोचे उत्पन्न घेते. त्यानंतर बिहार, कर्नाटका, त्याचबरोबर महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी उत्पन्न घेतले जाते. टोमॅटोचे काढणीच्या वेळी अंदाजित तोटा ५ ते ५० टक्के इतका होतो.
सध्यस्थिती:ला आपल्याकडे टोमॅटो उत्पन्न जरी मोठ्या प्रमाणावर होत असेल तरी पुढील प्रक्रिया कमी होतात. टोमॅटो हा पेरीशेबल (नाशवंत) जातीतील असल्याने त्यात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. ज्या फळांमध्ये किंवा पालेभाज्यां मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल त्या लवकर खराब होतात. आपला देश हा विकसनशील देश आहे. म्हणजेच विकासाच्या मार्गावर आहे. त्यामुळे कच्च्या मालावर जी प्रक्रिया करणे गरजेचे आहे ती शक्य होत नाही त्यामुळे बराचसा माल खराब होतो. काही टक्के आपण निर्यात करतो. त्याचबरोबर काहीवर छोट्या मोठ्या कंपन्या प्रक्रिया करतात. आणि नविन पदार्थ बनवतात. आपले शेतकरीबंधू टोमॅटोचे उत्पन्न घेऊन माल निर्यात करतात त्यामागील कारण कदाचित कमी साठवणूकीच्या सुविधा सुद्धा असू शकतात. त्यानंतर बाकीचे देश आपल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून सुशोभीत पॅकेजींग आणि लेबलींग करून नवीन पदार्थ जास्त किमतीमध्ये आपल्याच शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागत आहेत. त्यापेक्षा जर शेतकऱ्यांनी छोटासा प्लॉट उभा केला ते पण कमी खर्चामध्ये आणि स्वतः पदार्थ बनवलेले तर निश्चित नफा जास्त होईल. ज्यावेळेस पदार्थ बनवले जातात अन् तयार होतात. त्यानंतर त्या कच्च्या मालाला काय भाव आहे. त्याचा फरक पडत नाही. त्यामुळे ज्यावेळेस टोमॅटो रस्त्यावर फेकले जातात त्यावर प्रक्रिया करा आणि स्वत: चे नवीन खाद्य पदार्थ बाजारात आणा.
टोमॅटोपासून बनविले जाणारे नविन पदार्थटोमॅटोपासून आपल्याला टोमॅटो ज्यूस, टोमॅटो प्यूरी, पेस्ट, सॉसेज, केचप, चटनी, कॉकटेल, सूप, कॅनडु, टोमॅटो, टोमॅटो पिकल, टोमॅटो चिली सॉसेज इ. पदार्थ बनविले जातात. अन् या पदार्थाची मागणी बाजारामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील प्रक्रियाही १०० किलोसाठीची आहे.
टोमॅटो ज्यूस सामग्री : ज्यूस १०० लिटर, साखर १००० ग्रॅम, मीठ ५०० ग्रॅम, सायट्रीक अॅसिड १०० ग्रॅम, सोडीयम बेन्झोएट १०० ग्रॅम.प्रक्रियाटोमॅटो हे पूर्ण पिकलेले आणि लाल रंगाचे घ्या. त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यांना तुकड्यामध्ये काढून घ्या. त्यानंतर ७० ते ९० अंश सेल्सिअसमध्ये ३ ते ५ मिनिटांसाठी गरम करा. त्यानंतर त्यातून ज्यूस काढा. त्यामध्ये मीठ, साखर, आणि सायट्रीक अॅसीड मिसळा. त्यानंतर त्याला हालवून घ्या जेणेकरून सर्व एकत्रीत होईल. त्यानंतर ८२ ते ८८ अंश सेल्सिअसला गरम करा १ मिनीटासाठी. त्यानंतर त्यांना बॉटलमध्ये भरा. त्या बॉटलला निर्जंतूक करून घ्या व नंतर थंड करा.
टोमॅटो प्यूरी आणि पेस्टटोमॅटो प्युरी टीएसएस हा ९ ते १२ बीक्स इतका असावा. टोमॅटो पेस्ट २५ ते ३३ ब्रिक्स इतका टी.एस.एस. असावा.प्रक्रियाटोमॅटो ज्युस १०० लिटर घेऊन त्याला शिजवायचा त्यानंतर टीएसएस येऊ द्या. बॉटलमध्ये भरात्यावेळी ८२ ते ८८ अंश सेल्सिअस तापमान ठेवा. बॉटलला निर्जंतूक करून घ्या. त्यानंतर थंड करा.
टोमॅटो सॉस किंवा केचपसामग्री : फळातील गर १०० किलो, साखर ७५०० ग्रॅम, मीठ १००० ग्रॅम, कांदा ५००० ग्रॅम, आले १००० ग्रॅम, लसून ५०० ग्रॅम, लाल मिरची पावडर ५०० ग्रॅम, मसाले: जीरे, दालचिनी, इलायची. व्हिनेगार २५०० मिली सोडीयम बेन्झोएट २५ ग्रॅमप्रक्रियाटोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यांना कापून घ्या. त्यानंतर ७० ते ९० अंश सेल्सिअसला ३ ते ५ मिनीटांसाठी गरम करा. त्यानंतर ज्युस काढा. त्याला चाळून घ्या. त्याज्युसला साखर सोबत (१/३) शिजवा. त्यानंतर मसाल्यांची पिशवी (स्पाईस बॅग) आत सोडा. तिला थोड दाबा आणि बाहेर काढा. त्यानंतर साखर आणि मीठ टाका. त्यानंतर परत शिजवा. त्यानंतर टीएसएस. २८ ब्रीक्स तपासा. त्यानंतर व्हिनेगार टाका आणि ८८ अंश सेल्सिअसला बॉटलमध्ये भरा.
टोमॅटो चटणीसामग्री: टोमॅटो १०० किलो, साखर ५० किलो, मीठ २५०० ग्रॅम, कांदा १०,००० ग्रॅम, आले १००० ग्रॅम, लसून ५०० ग्रॅम, मिरची पावडर १००० ग्रॅम, इतर मसाले: इलायची, जीरे, दालचिनी. व्हिनेगार १०,००० मिली, सोडीयम बेन्झोएट ५० ग्रॅमप्रक्रियाटोमॅटोला स्वच्छ पाण्याने धुवून त्याला २ मिनीटांसाठी शिजवा. त्यासाठी तापमान ९२ अंश सेल्सिअस ठेवा. लगेच काढून थंड पाण्यामध्ये टाका. जेणेकरून वरची साल काढण सोप होईल. नंतर साल काढून त्याला ठेचा. नंतर इतर साहित्य व व्हिनेगार टाका आणि शिजवा. त्यानंतर मीठ टाका आणि ५ मिनीट शिजवा. त्यानंतर सोडीयम बेन्झोएट टाका.
टोमॅटो कॉकटेलसामग्री: टोमॅटो ज्युस १०० लिटर, मीठ ९०० ग्रॅम, निंबू रस ११०० मिली, मिरची पावडर २५ ग्रॅम, मसाले: इलायची, जीरे, दालचिनी. व्हिनेगार ६००० मि.लि.प्रक्रियाटोमॅटोचा रस गाळून घ्यावा. त्यामध्ये मसाल्यांची पिशवी ठेवावी. ती पिशवी २० मिनीट ठेवावी व मध्येमध्ये हळूच दाबत राहावी. त्यानंतर निंबूरस, व्हिनेगार आणि मीठ टाकावे. त्यानंतर त्याला ८२ ते ८८ अंश सेल्सिअस गरम करा आणि बॉटलमध्ये भरा.
टोमॅटो सूपसामग्री: गर १०० किलो, मीठ २००० ग्रॅम, साखर २००० ग्रॅम, क्रीम २००० ग्रॅम, स्टार्च १००० ग्रॅम, कांदा २००० ग्रॅम, लसूण ५०० ग्रॅम, मसाले: दालचिनी, इलायची, जिरे.प्रक्रियाटोमॅटो पल्प (गर) घेऊन त्याला शिजवायचा. त्यात मिठ, साखर, टाकून व्यवस्थीत एकत्र करा. त्यानंतर किम, स्टार्च आणि इतरमसाले टाका व शिजवा आणि बॉटलमध्ये भरा.
टोमॅटो पिकलसामग्री : टोमॅटो १०० किलो, मीठ ७,५०० ग्रॅम, लसूण १०० ग्रॅम, आले ५००० ग्रॅम, लाल मिरची १० किलो, मसाले: हळद, दालचिनी, मेथी, जीरे. व्हिनेगार २५,००० मि.लि. मोहरीचे तेल ३०,००० मि.लि.प्रक्रियाटोमॅटो स्वच्छ धुतल्या नंतर त्यांना ५ मिनिटांसाठी गरम पाण्यात ९२ अंश सेल्सिअस तापवा. त्यानंतर लगेच थंड पाण्यात टाका. त्यानंतर वरची साल काढा. नंतर बाकीचे मसाले तेलामध्ये टाकून घ्या. त्यांना टोमॅटोच्या तुकड्यासोबत मिसळा. राहिलेले तेल व व्हिनेगार त्यात मिसळा. जारमध्ये भरा.
टोमॅटो पावडरटोमॅटो स्वच्छ धुवून त्यांना ८२ अंश सेल्सिअसला ५ ते ६ मिनिटांसाठी गरम करायचे त्यानंतर त्वरित थंड पाणी ओतावे नंतर टोमॅटोचे काप करून ट्रे ड्रायरमध्ये ५० ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला १६ ते १८ तासांसाठी ठेवून द्यावेत. वाळलेल्या टोमॅटो मिक्सरमधून फिरवून पावडर करावी. तयार पावडर चाळणीने चाळून घ्यावी व पॉलीथीन मध्ये पॅक करा.
- सचिन अर्जुन शेळकेआचार्य पदवीचे विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सैम हिग्निनबॉटम कृषि प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश.८८८८९९२५२२sachinshelke252@gmail.com- प्रा. (डॉ.) संदीप प्रसादविभाग प्रमुख, डेअरी अभियांत्रिकी विभाग, सॅम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश.