Join us

Ragi Kurkure : नाचणीचे मूल्यवर्धित स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रागी कुरकुरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 3:00 PM

रागी कुरकुरे हा एक लोकप्रिय आणि पौष्टिक नाश्ता आहे. रागी, ज्याला नाचणी असेही म्हणतात, हे कडधान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर (healthy food) आहे. यामध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि खनिजे असतात.

रागी कुरकुरे हा एक लोकप्रिय आणि पौष्टिक नाश्ता आहे. रागी, ज्याला नाचणी असेही म्हणतात, हे कडधान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि खनिजे असतात.

रागी पासून कुरकुरे तयार करून याद्वारे एक चांगला प्रक्रिया उद्योग किंबहुना रागीचे मूल्यवर्धन केले जाऊ शकते. चला तर मग, रागी कुरकुरे कसे तयार करतात याची माहिती घेऊया.

घटक

१. रागी पीठ - १ कप२. उडीद डाळ पीठ - १/४ कप (कुरकुरीतपणासाठी)३. जिरं - १ चमचा४. हिरवी मिरची - १/२ (चवीनुसार)५. मीठ - चवीनुसार६. तलण्यासाठी तेल - आवश्यकतेनुसार७. आलं-लसूण पेस्ट - १ चमचा (ऐच्छिक)८. तिखट मिरची पावडर - १/२ चमचा (चवीनुसार)

प्रक्रिया 

१) कच्चा माल निवडणे : चांगला आणि ताजा रागी निवडा. यामुळे कुरकुर्याची चव आणि पोषणमूल्य सुधारेल.२) रागी पीठ तयार करणे : रागी आणि उडीद डाळ यांचे पीठ एका भांड्यात घाला. त्यात जिरे, मीठ, तिखट मिरची पावडर आणि आलं-लसूण पेस्ट घाला. चांगले मिसळा.३) पाण्याची मात्रा : या मिश्रणात हळूहळू पाणी घाला, ज्यामुळे मऊ आणि एकसारखे पीठ तयार होईल. पीठ खूप नरम किंवा कडक नसावे.४) आकार देणे : तयार केलेल्या पीठाच्या लहान लहान गोळ्या करा. या गोळ्या आपल्या आवडीनुसार विविध आकारात बनवता येऊ शकतात.५) तळणे : एका कढईत तेल गरम करा. त्यात तयार केलेले गोळे टाका आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळा. तेलाच्या तापमानावर लक्ष ठेवा, कारण जास्त तापमानामुळे कुरकुरे जळू शकतात.६) थंड करणे : तळून घेतलेले कुरकुरे किचन टॉवेलवर ठेवून थंड करा. यामुळे त्यातील अधिकचे तेल शोषले जाईल.७) पॅकेजिंग : थंड झाल्यावर कुरकुरे स्वच्छ पॅकेट्समध्ये भरा. योग्य पॅकेजिंगमुळे कुरकुरे ताजेतवाने राहतात.

पोषणात्मक फायदे

रागी, ज्याला 'फिंगर मिलेट' म्हणूनही ओळखले जाते, हा एक पोषक धान्य आहे जो भारताच्या अनेक भागांमध्ये प्रचलित आहे. त्याचा उपयोग विविध पाककृतींमध्ये केला जातो, त्यापैकी एक म्हणजे रागी कुरकुरी. रागी कुरकुरीमध्ये अनेक पोषणात्मक फायदे आहेत. यातील काही आरोग्यदायी घटक पुढीलप्रमाणे.

१) उच्च फायबर सामग्री - रागीमध्ये उच्च प्रमाणात फायबर असते, जे पचनास मदत करते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते, कारण फायबर मुळात जास्त वेळपर्यंत तृप्तता देतो.२) कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत - रागी कॅल्शियमच्या समृद्ध स्रोतांपैकी एक आहे. हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक आहे. यामुळे विशेषतः बालकांसाठी आणि वृद्धांसाठी रागी कुरकुरी फायदेशीर ठरते.३) ऊर्जा वाढवणारे - रागीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे उच्च प्रमाण आहे, जे शरीराला ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा खेळाडूंसाठी हे एक उत्तम नाश्ता आहे.४) अंतःस्रावी संतुलन - रागी कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करते. त्यामुळे डायबेटिसच्या रुग्णांसाठी रागी कुरकुरी एक चांगला पर्याय आहे.५) अँटिऑक्सीडंट गुणधर्म - रागीमध्ये अँटिऑक्सीडंट्स असतात, जे शरीरातील मुक्त कणांशी लढतात. यामुळे विविध रोगांचा धोका कमी होतो आणि आरोग्य टिकवण्यास मदत होते.६) पौष्टिक घटक - रागीमध्ये लोह, जस्त, आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स सारखे पौष्टिक घटक देखील आढळतात, जे शरीरातील विविध क्रियांसाठी आवश्यक आहेत.

डॉ. सोनल रा. झंवर साहाय्यक प्राध्यापकएम . जी . एम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर

हेही वाचा - Bajra Biscuits : आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बाजरीचे मूल्यवर्धित बिस्किट्स

टॅग्स :शेती क्षेत्रअन्नपाककृती 2023आरोग्यशेतकरी