Join us

फळप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी योजना, कुठे कराल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 3:18 PM

शेतीला जोडधंदा करण्यास आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली असून, तब्बल १० लाखांपर्यंत अनुदान मिळते. केवळ टोमॅटोच नव्हे, तर केळी, डाळिंब अथवा कोणतेही फळ किंवा पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची आणि उद्योगधंद्याची कास धरली पाहिजे, असा सल्ला कृषितज्ज्ञांकडून दिला जातो. जोडधंदा करण्यास आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली असून, तब्बल १० लाखांपर्यंत अनुदान मिळते. केवळ टोमॅटोच नव्हे, तर केळी, डाळिंब अथवा कोणतेही फळ किंवा पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो.

योजनेची प्रक्रिया ऑनलाइन आहे. एमआयएस पोर्टलवर अर्ज करावा लागतो. कृषी विभागाकडून ही योजना राबविली जाते. मदतीसाठी संसाधान व्यक्ती नियुक्त आहेत. केंद्रामार्फत विविध उद्योगांसाठी खूप योजना राबविल्या जातात. त्यापैकीच ही एक योजना आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी वेबसाईट: https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/

काय आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना?केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत ही योजना सुरु केली आहे. अन्नपिकांवर प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदान देय आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यास मदत करून उद्योजक बनविण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

कोणाला करता येतो अर्जजे शेतकरी उद्योजक होण्यास इच्छुक असतील, असे सर्व शेतकरी पात्र आहेत. सोबतच वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, गट लाभार्थी इत्यादी व्यक्तीसुद्धा योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

अटी व शर्ती काय आहेत?- अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असावा.- वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे.- या योजनेअंतर्गत शिक्षणाची कोणत्याही प्रकारची अट नाही.- एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.- पात्र प्रकल्प किमतीच्या किमान दहा टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी अर्जदाराची असावी लागते.

सर्व उद्योगासाठी अर्जसुरुवातीला जिल्ह्यांची निवड फक्त्त ठराविक फळ पिकांवर प्रक्रिया उद्योगासाठी केली होती. परंतु, शासनाने ही अट रद्द केली असून, कोणत्याही पिकावर प्रक्रिया उद्योग करता येतो.

योजनेचा लाभ घ्याप्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संसाधन व्यक्तीची नियुक्ती केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा आणि उद्योग सुरु करून सक्षम व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :टोमॅटोपीकपंतप्रधानसरकारी योजना