राज्यात पुणे तसेच सातारा जिल्ह्यात सीताफळाची शेती केली जाते व इतर जिल्ह्यामध्ये सीताफळ हे नैसर्गिकरीत्या लागवड होत असल्यामुळे सीताफळ हे वन उत्पादन समजले जाते.
उदा. बीड, नांदेड इ. राज्यात पुणे व सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त सीताफळावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. हे पाहून इतर जिल्ह्यात पण काही ठिकाणी सीताफळ प्रक्रिया उद्योग उभारले जात आहेत.
सीताफळ हे नाशवंत आणि खूप कमी काळ टिकणारे फळ असून त्यावर वेळेत प्रक्रिया न केल्यास त्याची नासाडी होते. तसेच प्रक्रियेसाठी वापरले जाणारे सीताफळ हे जास्त पिकलेले असल्यास त्यास अळी लागण्याची शक्यता जास्त असते.
सीताफळ प्रक्रिया
प्रक्रिया करण्यासाठी चांगल्या प्रकारे नैसर्गिक झाडावर पिकलेले सीताफळ किंवा परिपक्व सीताफळ जागेवर आणून त्यांना कृत्रिम पद्धतीने पण पिकवू शकता.
सीताफळ पल्प तयार करण्याची प्रक्रिया
- फळ निवड :
ताजे आणि पिकलेले सीताफळ निवडा. पिकलेल्या फळांमध्ये गोडसर सुगंध येतो आणि त्याची साल हलकी मऊ होते. - फळ स्वच्छ करणे फळे स्वच्छ करून घ्या. जेणेकरून त्यावरील माती आणि धूळ पूर्णपणे निघून जाईल.
- बी काढणे :
फळाच्या आतील गोड गाभा काढण्यासाठी बाजारात असलेले सीताफळ गर काढणी यंत्र वापरा किंवा हाताने गर कढता येतो. हाताने गर काढत असताना अगोदर पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्यावे त्यानंतर हातात ग्लोव्हज् घालून त्यातील बिया बाजूला काढून गर एकत्र साठवून ठेवा. - पल्प बनवणे :
गर मिक्सर किंवा ग्राइंडरमध्ये टाकून मऊ पेस्ट तयार करा. मिक्सरमध्ये दीर्घकाळ वाटून गर अधिक मऊ आणि एकसारखा बनवता येईल. - गाळणे :
गर गाळण्यासाठी बारीक गाळणी वापरा. जेणेकरून उरलेले लहान बिया किंवा कोणतेही घटक गरमध्ये राहणार नाहीत. - पॅकिंग :
तयार गर निर्जंतुक केलेल्या कंटेनरमध्ये साठवा. जर पल्प दीर्घकाळ साठवायचा असेल तर काच किंवा प्लास्टिकचे एअरटाइट कंटेनर वापरा. - शीतकरण :
पल्प किंवा गराचा ताजेपणा टिकवण्यासाठी त्याला गोठवणे गरजेचे आहे. त्यासाठी - २५ ते - ४० अंश सेल्सिअस Blast Freezing प्रक्रिया किमान ४ तासासाठी करावी. गर घट्ट झाल्यावर त्याला फ्रीजरमध्ये ठेवा. गोठवलेला गर - १८ अंश सेल्सिअस ठेवावा लागतो. ज्यामुळे तो अधिक काळ टिकतो.
अधिक वाचा: Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर