Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > Soybean process : सोयाबीन प्रक्रियेतून प्रोटीन दुधाची निर्मिती कशी कराल? वाचा सविस्तर

Soybean process : सोयाबीन प्रक्रियेतून प्रोटीन दुधाची निर्मिती कशी कराल? वाचा सविस्तर

Soybean process : How to produce protein milk from soybean process? Read in detail | Soybean process : सोयाबीन प्रक्रियेतून प्रोटीन दुधाची निर्मिती कशी कराल? वाचा सविस्तर

Soybean process : सोयाबीन प्रक्रियेतून प्रोटीन दुधाची निर्मिती कशी कराल? वाचा सविस्तर

सोयाबीनपासून अनेक पौष्टीक पदार्थ तयार करता येतात. यात सोयादूध हा एक पौष्टीक पदार्थ आहे. त्याची सविस्तर माहिती घेऊ या. (Soybean process)

सोयाबीनपासून अनेक पौष्टीक पदार्थ तयार करता येतात. यात सोयादूध हा एक पौष्टीक पदार्थ आहे. त्याची सविस्तर माहिती घेऊ या. (Soybean process)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean process : आरोग्यवर्धक सोयाबीनचा उपयोग भारतात फक्त तेल काढण्यापुरताच मार्यादित आहे. आहारामध्ये प्रथिनेसमृध्द सोयाबीनचा वापर करुन सामान्य जनतेचे पोषण सुधारण्यास मदत होऊ शकते. सोयाबीनवर प्रक्रिया करुन त्यापासून विविध पारंपारिक पदार्थ तयार करता येतात. 

सोयाबीनपासून अनेक पौष्टीक पदार्थ तयार करता येतात. यात सोयादूध हा एक पौष्टीक व स्वस्त पदार्थ आहे. ग्रामीण भागात सोयाबीन उपलब्ध असल्यामुळे त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाला मोठा वाव आहे. तसेच सोयाबीनवर आधारीत हे शेतातच सुरु करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. 

शिवाय सोयाबीनपासून तयार केलेले दूध स्थानिक लोकांना स्वस्त दरात उपलब्ध होईल व त्यामुळे काही अंशी प्रथिने व ऊर्जेच्या अभावी 
आढळणाऱ्या कुपोषणाला आळा बसेल. 

सोयादुधाचे महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे कमी किंमत, अधिक पोषण तत्वे व दूधातील लॅक्टोज हा घटक पचण्यासाठी  योग्य आहे. सोयादुधापासून विविध दुग्धजन्य पदार्थ बनविता येतात. उदा. पनीर, दही, श्रीखंड, आम्रखंड, आईस्क्रीम आदी पदार्थांची निर्मिती केली जाते. 

सोयादूध गुणवत्ता व पौष्टीकतेच्या बाबतीत आईच्या दुधाच्या बरोबरीचे आहे. गाई- म्हशीच्या दुधाच्या तुलनेत सोया दुधाचा दर अत्पल्प आहे. त्यामुळे सोया दुधाला बाजारपेठेत लवकरच मान्यता प्राप्त होऊ शकते. 

एक किलो सोयाबीन पासून प्रक्रियेनंतर साधारणतः ६ ते ८ लिटर दूध तयार होते आणि १.१  ग्रॅम इतका चोथा मिळतो या चोथ्यामध्ये १८ टक्के प्रथिने व इतर पोषण तत्वे असतात. चोथ्याच्या उपयोग आपण बिस्कीट, गुलाबजाम तसेच बर्फी तयार करण्यासाठी करु शकतो. 

सोयाबीन दूध तयार करण्याची पद्धत 

* प्रथम स्वच्छ सोयाबीन घ्यावे. 

* सोयाबीन डाळ १:३ प्रमाणात  ८ ते ९ तास पाण्यात भिजवून घ्यावी. 

* भिजलेली सोयाबीन डाळ व गरम पाणी १:८ प्रमाणात ग्राइंडरमधून दळून घ्यावी.

 * मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. 

* सोया दूध तयार होईल. 

 * सोया दूध पाच मिनिटे उकळून घ्यावे.

* दूध थंड करुन घ्यावे. 

* दुधात वेलची केशर अथवा इतर फ्लेवर व साखर मिसळावी. 

* दूध निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरावे. 

* सील बंद केलेल्या दुधाच्या भरलेल्या बाटल्या निर्जंतुक करुन घ्याव्यात. 

सोयाबीनचे महत्त्व 

* सोयाबीनमध्ये सरासरी ४३ टक्के प्रथिने २३ टक्के कर्बोदके आणि १९ टक्के खाद्यतेलांचा समावेश आहे. 

* सोयाबीन हे डाळवर्गीय पीक असल्याने त्याच्या मुळावर गाठी येतात आणि या गाठींमुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध करून देतात. 

* सोयाबीनच्या झाडाचा पालापाचोळा सरासरी २ ते ३ टन हेक्‍टरी जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. 

* सोयाबीनमध्ये ३० टक्के खाद्यतेल व ५० टक्के प्रथिनांची गरज भागवली जाते. 

* दुभत्या जनावरांना व कुक्कुट पालनासाठी या पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग होतो. 

* सोयाबीनचा वापर हो पेन्सिलिंग सायकलिंग, टेट्रासायक्लिन, इरीथ्रोमायसी आदी प्रति जैविक तयार करण्यासाठी होतो.

* कमीत कमी वेळात व कमी खर्चात येणारे चांगले उत्पादन देणारे सोयाबीन हे उत्तम फायदेशीर पीक आहे. 

* सोयाबीनपासून बरेच खाद्यपदार्थ तयार करता येतात. 

* सोयाबीनमध्ये पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात असल्यामुळे मधुमेहींच्या रोजच्या सेवनाला उत्कृष्ट समजला जातो 

सोयाबीनचे उपयोग 

* तेल खाद्यतेल तसेच उद्योगांमध्ये वापरतात. 

* मानवी खाद्य पशुखाद्य व औद्योगिक माल म्हणून म्हणून वापरतात. 

* मनुष्य, प्राणी याच्या बी चे सेवन करू शकतात. 

* सोयाबीनच्या 'बी'चा वापर पेरणीसाठी केला जातो. 

* तेल- तळायला तेल, कॉफी, क्रीमर औषधी आदीमध्ये केला जातो.

 * तांत्रिक उपयोग - गंजरोधक, डिझेल इंजिनमध्ये, जंतुनाशक, बुरशीनाशक, छपाईची शाई, पेंट्स, तेलकट वस्तूंमध्ये विद्युत विरोधकांमध्ये साबण तयार करण्यासाठी उपयोग होतो. 

* सोयाबीनचा उपयोग - बेकरी उत्पादने, साबण, शाम्पू, सौंदर्य प्रसाधने, औषधे यासाठी केला जातो.

- डॉ. दिप्ती पाटगावकर 
(लेखिका बीड येथील कृषी विज्ञान केंद्र, खामगाव येथे कार्यक्रम समन्वयक पदावर कार्यरत आहेत.) 

Web Title: Soybean process : How to produce protein milk from soybean process? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.