महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी ता. राहुरी जि. अहमदनगर अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत आवळा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सुशिक्षित बेरोजगारांसाठी करण्यात आलेले आहे. त्याबाबतची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे.
प्रशिक्षणात शिकविले जाणारे प्रक्रिया पदार्थआवळा कॅन्डी, आवळा गर साठवण, आवळा लोणचे, आवळा सरबत, आवळा सुपारी, आवळा मुरंबा, आवळा सिरप व स्क्वॅश आणि आवळा पावडर इत्यादी.
प्रशिक्षणात आणखी काही शिकविले जाणारे विषय- आवळा प्रक्रिया व्यवसाय कसा सुरु करावा?- अन्न व सुरक्षितता व मानके कायद्याची माहिती आणि प्रक्रिया उद्योगाची नोंदणी कशी करावी?- आवळा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी मशिनरी व त्यांची देखभाल कशी करावी?- आवळा पदार्थाचे पॅकेजींग आणि मार्केटींग कसे करावे?- आवळा प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या कोणत्या कर्ज योजना/अनुदान आहेत?- आवळा प्रक्रिया उद्योगातील अडचणी कोणकोणत्या आहेत? त्यावर उपाययोजना काय आहेत?- आवळा प्रक्रिया उद्योगाचे व्यवस्थापन कसे करावे?
प्रशिक्षण कालावधीदि. २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२४ (पाच दिवस)
वेळस. १०.०० ते सायं. ५.०० पर्यंत
प्रशिक्षण शुल्कदि. १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणीस रु.४,०००/- (चार हजार रुपये मात्र)तद्नंतर शुल्क रु.४,५००/- (चार हजार पाचशे रुपये मात्र)प्रशिक्षण ठिकाणमध्यवर्ती परिसर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
तरी इच्छुकांनी लेखा व अधिदान अधिकारी, मफुकृवि, राहुरी यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक खाते क्र. 38817479754 IFSC Code: SBIN0003239. वर शुल्क जमा करावे व त्याचा स्क्रिन शॉट कार्यालय प्रतिनिधी श्री. राहुल घुगे 9421437698 यांच्या मोबाईलवर पाठवावा.
अधिक माहितीसाठी संपर्ककार्यालय 02426 - 243259श्री. राहुल घुगे 9421437698