सूर्यकांत किंद्र
भोर: भोर तालुक्यात खरिपाचा हंगाम संपला असून शेतकरी आपल्या वर्षभराच मोलाचं भात हे पीक कांडप करण्याच्या कामात व्यस्त झाला आहे. गावोगावी असणाऱ्या राईस मिल सुरू झाल्या असून दरवर्षीप्रमाणे यंदाही राईस मिल मालकाकडून शेतकऱ्यांना भात वाहतुक मोफत करून पुन्हा घरपोच तांदळ केला जात आहे. भात कांडपाला सध्या वेग आला असून यावर्षीही तालुक्यात भाताच्या इंद्रायणी याच वाणाचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत कमी निघाले असून राईस मिल सुरु होताच इंद्रायणी तांदळाचा वास सर्वत्र पसरला आहे.
भोर तालुका हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला तालुका आहे. पावसाचे प्रमाण या वर्षीं जरी कमी अधिक असले तरी या तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७४०० हेक्टवर भाताची लागवड केली जाते. या प्रामुख्याने इंद्रायणी, रत्नागिरी २४, कोलम, कोळंबा, आंबेमोहोर, बासमती, गंगा कावेरी, कर्जत अशा अनेक भात जाती या अनेक जातीची लागवड केली जाते. भोरचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ सर्वत्र प्रसिद्ध आहे. तसेच येथील इंद्रायणी तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने येथील शेतकरी इंद्रायणी याच जातीचे भात मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पन्न घेतले जात आहे. सध्या सर्वत्र राईस मिल सुरू झाल्याने शेतकरी आपले साठवून ठेवलेले हे भात पीक कांडप करून आणण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे.
अधिक वाचा: हरभरा पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे कराल?
ग्रामीण भागात राईस मिलवाले शेतकऱ्यांना मोफत वाहन सेवा भात कांडप करून घरपोच तांदुळ देत आहे. त्यामुळे घरी साठवलेले भात लवकरात लवकर कांडप करून आणण्यासाठी शेतकरी धडपड सुरू आहे. यामुळे राईस मिलवर भात भरडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी गर्दी करताना दिसत आहेत. भात भरडून तांदूळ तयार झाल्यावर शेतकरी तांदुळ विक्रीसाठी बाजारात आणतात तर काहीजण घरीच विकतात, हॉटेल व्यापारी यांना विकतात. सुमारे ५५ ते ६० रु प्रति किलो भाव आहे. मात्र ग्रामीण भागातील गिरणी म्हणजे भात भरडण्याच्या हालरची जागा आत्ता राईल मिलने घेतली आहे. यामुळे तांदुळ पॉलिश होतो आणि चवीत फरक पडतो.
भात कांडप केल्यानंतरही यामधील निघणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग चांगला होत आहे. हा कच्चा माल म्हणजे भाताचे तूस, कोंडा याचा उपयोग पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांच्या वीटभट्टीसाठी, खाद्यासाठी, जनावरांच्या खाद्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच भात कांडप करताना तांदूळ सोलत असताना त्यात निघणारी पावडर मोठ्या कंपन्यांना विविध उत्पादनासाठी जाते. तसेच अशा राईस मिलमुळे अनेक कामगारांचे प्रपंच चालत आहेत.
तालुक्यातील कारी, निगुडघर नांदगाव, आंबेघर, खानापूर, माळवाडी, बारे बु, टिटेघर, नांदगाव, नन्हे, भोलावडे या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात भात कांडप करण्यासाठी येत असून येथील राईस मिल मालकाकडून मोफत वाहतुकीसह, भात कांडप करून देऊन घरपोच तांदुळ सेवा दिली जात आहे. सध्या बाजारात शेतकऱ्यांचा नवीन कांडप केलेला इंद्रायणी तांदूळ आला असून पंचावन्न ते साठ रुपये प्रति किलो भाव या तांदळाला मिळत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
कारी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची नवीन राईस मिल मशीनरी बसविली असून शेतकऱ्यांना तांदळावा जादा उतारा मिळत आहे. - हभप बापू देबे
नवीन अत्याधुनिक राईस मिल उभारली आहे. त्यामुळे आवका तांदूळ तवार होतो. आणि बाजारात याला अधिक मागणी आहे. हॉलर गिरणीप्रमाणे राईस मिलवरची तुकडा असलेला तांदूळ आम्ही भरडून देतो. - सतीश ढेबे (सरपंच, कारी)