Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > बाजारात वर्षभर मागणी असलेल्या 'या' उत्पादनाची करा निर्मिती; बाजरीचे मूल्यवर्धन होऊन उपलब्ध होतील रोजगार संधी

बाजारात वर्षभर मागणी असलेल्या 'या' उत्पादनाची करा निर्मिती; बाजरीचे मूल्यवर्धन होऊन उपलब्ध होतील रोजगार संधी

This product, which is in demand in the market all year round, should be produced; Employment opportunities will be available by adding value to millet | बाजारात वर्षभर मागणी असलेल्या 'या' उत्पादनाची करा निर्मिती; बाजरीचे मूल्यवर्धन होऊन उपलब्ध होतील रोजगार संधी

बाजारात वर्षभर मागणी असलेल्या 'या' उत्पादनाची करा निर्मिती; बाजरीचे मूल्यवर्धन होऊन उपलब्ध होतील रोजगार संधी

Value Added Products Of Millets (Bajari) : वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आणि आहाराच्या बदलत्या पद्धतींमुळे, पारंपारिक अन्नपदार्थांपेक्षा नव्या आणि पोषणतत्मक अन्नपदार्थांचा वापर वाढला आहे. यामध्ये बाजरीचे मूल्यवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे तसेच आर्थिक फायद्याचे देखील आहे.

Value Added Products Of Millets (Bajari) : वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आणि आहाराच्या बदलत्या पद्धतींमुळे, पारंपारिक अन्नपदार्थांपेक्षा नव्या आणि पोषणतत्मक अन्नपदार्थांचा वापर वाढला आहे. यामध्ये बाजरीचे मूल्यवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे तसेच आर्थिक फायद्याचे देखील आहे.

शेअर :

Join us
Join usNext

वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आणि आहाराच्या बदलत्या पद्धतींमुळे, पारंपारिक अन्नपदार्थांपेक्षा नव्या आणि पोषणतत्मक अन्नपदार्थांचा वापर वाढला आहे. यामध्ये बाजरीचे मूल्यवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे तसेच आर्थिक फायद्याचे देखील आहे.

बाजरीमध्ये अनेक पोषणतत्मक घटक आहेत. ज्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे बाजरीच्या पीठाचे विविध उत्पादने तयार करून त्याचा आहारात समावेश करणे आरोग्यदायी आहे.

बाजरीची विविध उत्पादनं, जसे की ब्रेड, केक, नूडल्स, बिस्कीट, पोहे, लस्सी इत्यादी तयार केल्यास यामुळे बाजरीला अधिक लोकप्रियता मिळेल आणि वापर अधिक प्रमाणात वाढेल. तसेच यामुळे पारंपरिक बाजरी उत्पादक शेतकरी देखील सुखावला जाईल. 

मूल्यवर्धित बाजरी उत्पादने

पिठाचे उत्पादन : बाजरीचे पीठ तयार करण्याच्या प्रक्रियेत त्याचे लायपेज विकर नष्ट केले जाते. यामुळे बाजरीचे पीठ दीर्घकाळ सुरक्षित राहते आणि खराब होण्याचा धोका कमी होतो.

तेल निर्मिती : बाजरीमध्ये जास्त प्रमाणात मेद असतो. यामुळे बाजरीपासून तेल तयार करणे शक्य आहे, जे इतर तृणधान्यांपेक्षा अधिक पोषणतत्मक असू शकते.

लस्सी : बाजरीपासून तयार होणारी लस्सी अधिक आरोग्यवर्धक ठरते, कारण ते दह्यामध्ये रूपांतरित होऊन तयार होते, जे पचनासाठी फायदेशीर आहे.

ब्रेड : बाजरीच्या पिठापासून तयार केलेले ब्रेड ग्लुटेन-मुक्त असतात आणि त्यामध्ये लोह, प्रथिने आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी लाभकारी ठरतात.

रबडी : बाजरीचे पीठ ताकासोबत मिसळून आंबवून रबडी तयार करता येते. हे पिण्याचे पदार्थ शरीरासाठी उर्जा व पोषण देणारे असतात.

संमिश्र पीठ : गहू, मका आणि बाजरी यांच्या मिश्रणातून पोषणतत्मक संमिश्र पीठ तयार करता येते, ज्यामुळे त्यातील कडधान्यांचा पोषण मूल्य अधिक वाढतो.

बेकरी उत्पादने : बाजरीच्या पीठापासून विविध बेकरी उत्पादने जसे की बिस्कीट, कुकीज, ब्रेड, पिझ्झा तयार करता येतात. यामध्ये ग्लुटेन-मुक्त आणि पोषणतत्मक घटक जास्त असतात.

पोहे : बाजरीच्या रोलर फ्लेकिंग तंत्राने तयार केलेले पोहे ग्लुटेन-मुक्त असतात आणि त्यात अधिक कॅल्शिअम, लोह व मॅग्नेशिअम यांसारखे खनिज समृद्ध असतात.

पशुखाद्य निर्मिती : बाजरी पशू व कुक्कुटांचे खाद्य म्हणून वापरता येते.

अशा प्रकारे बाजरीचे मूल्यवर्धन केल्यास बाजरीचे विविध पदार्थ अर्थात उत्पादने होऊ शकतात. जे लोकांच्या जीवनशैलीसाठी अधिक फायदेशीर ठरतील. 

हेही वाचा : पोह्यापासून ते बियर पर्यंत ज्वारी पासून काय काय होतंय; वाचा ज्वारीच्या मूल्यवर्धित पदार्थांची सविस्तर माहिती

Web Title: This product, which is in demand in the market all year round, should be produced; Employment opportunities will be available by adding value to millet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.