उद्योगांच्या वार्षिक उलाढालीच्या गणनेतून निर्यात निकष वगळण्याची तरतूद केली असून एमएसएमई उद्योगांना भीती न बाळगता अधिकाधिक निर्यात करण्यास प्रोत्साहित करत आहे.
मंत्रालयामार्फत उद्योगांना ऑनलाईन पोर्टलवर उद्योगांची नोंदणी करून उद्यम नोंदणी किंवा उद्यम आधार प्राप्त करता येते.
उद्योग नोंदणीची ठळक वैशिष्ट्ये
१) https://udyamregistration.gov.in/UdyamRegistration.aspx या पोर्टलवर उद्योग चालू केल्यानंतर स्वयंघोषणेने कोणालाही उद्योगाची नोंदणी करता येईल. केंद्र शासनाच्या सिंगल विंडो सिस्टीमचे हे पोर्टल वगळता इतर कोणतीही खाजगी ऑनलाइन किंवा ऑफलाईन प्रणाली, सेवा, एजन्सी किंवा व्यक्ती MSME नोंदणी करण्यासाठी किंवा प्रक्रियेशी संबंधित कोणतीही व्यक्ती या प्रक्रियेसाठी अधिकृत किंवा पात्र नाही.
२) या पोर्टलचा उद्देश उद्योजकांसाठी व्यवहाराचा वेळ आणि खर्च कमी करणे तसेच व्यवसायाची/उद्योगाची सुलभता व उद्योगांना प्रोत्साहन देणे हा आहे.
३) उद्योग नोंदणीची ही प्रक्रिया संपूर्णपणे डिजीटल आणि पेपरलेस आहे. नोंदणी करताना कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
४) उद्योग नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. उद्योग नोंदणी करण्याकरिता कोणताही खर्च किंवा फी कोणालाही द्यावी लागत नाही.
५) ई-प्रमाणपत्र उद्योग नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ऑनलाईन दिले जाते.
६) ई-प्रमाणपत्रात डायनॅमिक क्यूआर कोड असून, यातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या पोर्टलवरील वेब पृष्ठ आणि उद्योग विषयीच्या तपशिलाबाबत माहिती प्राप्त केली जाऊ शकते.
७) उद्योग नोंदणी किंवा अद्ययावत प्रक्रियेमध्ये उद्योगांनी घोषित केलेली तथ्ये आणि आकडेवारी चुकीची किंवा दडपली असल्यास असे उद्योग दंडास पात्र ठरतील.
८) ऑनलाईन प्रक्रियेत आयकर, वस्तू आणि सेवा कर ओळख क्रमांक (जीएसटीआयएन) पूर्णपणे समायोजित आहे. गुंतवणूक आणि उद्योजकांच्या उलाढालीचा तपशील आपोआप डेटा बेसमधून घेतला जातो.
९) ज्या उद्योगांची ईएम-२ किंवा यूएएम नोंदणी आहे किंवा एमएसएमई मंत्रालयांतर्गत कोणत्याही प्राधिकरणाद्वारे जारी केलेली इतर नोंदणी आहे, अशा उद्योगांना पोर्टल वर स्वतः ची पुन्हा उद्योग नोंदणी करणे आवश्यक आहे.
१०) कोणताही उद्योग एकापेक्षा जास्त उद्यम नोंदणी दाखल करू शकत नाही.
अधिक वाचा: Satbara Utara : ५० वर्षानंतर सातबारा उताऱ्यात झाले हे मोठे बदल; वाचा सविस्तर