Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करायचाय? या ठिकाणी आहेत अमर्याद संधी

कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करायचाय? या ठिकाणी आहेत अमर्याद संधी

Want to start an agro processing industry? There are limitless opportunities here | कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करायचाय? या ठिकाणी आहेत अमर्याद संधी

कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करायचाय? या ठिकाणी आहेत अमर्याद संधी

कृषी मालाची साठवणूक व आयुर्मान वाढविण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. तसेच टिकाऊ पदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून तयार केले जातात. यालाच 'कृषी माल प्रक्रिया' असे म्हटले जाते.

कृषी मालाची साठवणूक व आयुर्मान वाढविण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. तसेच टिकाऊ पदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून तयार केले जातात. यालाच 'कृषी माल प्रक्रिया' असे म्हटले जाते.

शेअर :

Join us
Join usNext

कृषी मालाची साठवणूक व आयुर्मान वाढविण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. तसेच टिकाऊ पदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून तयार केले जातात. यालाच 'कृषी माल प्रक्रिया' असे म्हटले जाते.

योग्य प्रक्रिया जर केली तर काढणीनंतर होणारी हानी तसेच अयोग्य हाताळणीमुळे, साठवणुकीच्या असुविधेमुळे अन्न पदार्थाच होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. पिकांची काढणी केल्यानंतर मळणी, स्वच्छता, वाळविणे, हाताळणी, भरणे व साठवण या प्रक्रिया प्रामुख्याने शेतकरीस्तरावर केल्या जातात.

वाळवणे, साठवणे, विविध व विशिष्ट प्रक्रिया करणे, हाताळणे, भराई व साठवण या प्रक्रिया उद्योगाच्या स्तरावर केल्या जातात. प्रक्रिया उद्योगासाठी प्रामुख्याने वाळवणी यंत्र, हाताळणी यंत्रे, शीतकक्ष, शीतगृह, स्वच्छता करणारी यंत्रे, प्रतवारी यंत्रे, दालमिल, राईसमिल, बीजप्रक्रिया यंत्रे आदींची आवश्यकता आहे.

फळे व भाज्यांपासून वेगवेगळे टिकाऊ पदार्थ बनविता येतात. यामध्ये सरबत, स्क्वॅश, सिरप, जॅम, चटणी, मुरांबा, कॅन्डी, बर्फी, भुकटी, लोणची, जेली, आंबापोळी, फणसपोळी, कोकम तेल, आगळ, आमसूल, फणस चिप्स, बटाटा वेफर्स आदी पदार्थाचा समावेश होतो.

अन्नपदार्थाचे व फळांचे नुकसान व नासाडी टाळण्यासाठी कृषी प्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. कृषी प्रक्रियेमुळे ज्या भागात या फळांचे उत्पादन होत नाही तेथे पुरवठा करणे शक्य होईल व ग्रामीण भागात रोजगार निर्मितीही होईल. कच्चे काजूगर हे मुख्यतः काजू करी बनवण्यासाठी उपयुक्त असतात.

सुकवलेले काजूगर ते साठवून ते पुन्हा गरजेप्रमाणे वापरले जाऊ शकतात. कच्चे काजूगर हे मायक्रोव्हेव ड्रायर व ट्रे ड्रायरमध्ये वाळवून हे काजूगर १२ महिने साठवून ठेवले जाऊ शकतात.

काजूबिया काढणीनंतर चांगल्या सुकवल्यानंतर बॉयलरच्या सहाय्याने वाफवतात. त्यानंतर वाफवलेल्या बिया यंत्राद्वारे योग्य तापमानास वाळविल्यानंतर फोडणी करून काजूगर मिळवतात. काजूगर प्रतवारी करून विक्री केले जातात.

चांगल्या रंगाचे व अखंड काजूगर मिळविण्यासाठी बियांना योग्य तापमानात बाष्प देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये उपपदार्थ म्हणून काजू बीच्या टरफलावर प्रक्रिया करून टरफलाचे तेल मिळते, तेलासाठी चांगली मागणी असून व्यवसाय फायदेशीर आहे.

अधिक वाचा: साठवणूकीत गूळ खराब होवू नये म्हणून कसे करावे ऊस पिक व्यवस्थापन

कोकणचा विचार करता नाचणी मूल्यवर्धनातील संधी
-
नाचणीमध्ये प्रथिनांचे प्रमाण ६ ते ९ टक्क्यांपर्यंत आहे. या धान्यांमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम व लोह यांचे प्रमाण इतर तृणधान्यापेक्षा सर्वात जास्त आहे.
परंतु नाचणीच्या रंगामुळे बऱ्याच लोकांना ते आवडत नाही. म्हणून त्यांच्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- आतापर्यंत नाचणीपासून पापड, नाचणी पेज, लाडू, नाचणी भरडी, नाचणी सत्व आदी प्रक्रियायुक्त्त पदार्थ बनवले जातात.
- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने नाचणीपासून कुरकुरे तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
- नाचणीपासून कुरकुरे तयार करत असताना नाचणी या पिकाचे मूल्यसंवर्धन केले जात आहे.

Web Title: Want to start an agro processing industry? There are limitless opportunities here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.