आहारात कारल्याचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, कारल्याचा रस पिल्याने किंवा आपल्या आवडीच्या पद्धतीने सेवन केल्याने शरीराला अधिक 'इन्सुलिन' तयार करण्यास प्रोत्साहित करते, जे रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे कमी करण्यास मदत करते.
ही भाजी मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. कारल्याच्या इतर आरोग्य फायद्यांमध्ये हृदयरोग आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यासाठी शरीरात साठवलेल्या कोलेस्टेरॉलची उच्च पातळी कमी करण्यास मदत करणे देखील समाविष्ट आहे.
त्वचेसाठी कारल्याच्या रसाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्याची क्षमता! या भाजीच्या सेवनाने रक्त शुद्धीकरण चांगले होते, परिणामी त्वचा नैसर्गिकपणे स्वच्छ राहते.
कारल्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. त्यात जस्त आणि प्रथिने असतात जी केसांची गुणवत्ता आणि मजबुती सुधारण्यास मदत करतात.
कारल्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थामध्ये कारल्याचे काप वाळवून त्यापासून चहा बनविला जातो. आरोग्यवर्धक चहा म्हणून याला मागणी आहे. चांगली मागणीसुद्धा आहे. चहा कसा बनवायचा ते पाहूया.
कारल्याचा चहा कसा बनवायचा?
१) चहा तयार करण्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये कारली स्वच्छ धुऊन घ्यावीत.
२) मऊ स्पंजच्या साह्याने वरील पृष्ठभाग घासून साफ करावा.
३) लांबीच्या बाजूने दोन भाग करून, त्यातील गर व बिया चमच्याने काढून टाकाव्यात.
४) त्यानंतर कारल्याचे पातळ काप करून घ्यावेत. हे काप जितके पातळ असतील, तितके लवकर वाळतात आणि बारीक करणे सोपे जाते.
५) ट्रेमध्ये किंवा स्टीलच्या ताटात हे काप एका थरामध्ये पसरून ठेवून, त्यावर जाळी लावावी. म्हणजे कीटक आणि धूळ रोखली जाते.
६) हे ट्रे सूर्यप्रकाशामध्ये वाळण्यासाठी ठेवावेत. यासाठी वातावरणानुसार एक किंवा दोन दिवस लागू शकतात.
७) फूड प्रोसेसरच्या साह्याने वाळवलेल्या कापांची भुकटी करून घ्यावी.
८) ही भुकटी हवाबंद डब्यामध्ये भरून थंड आणि कोरड्या जागेमध्ये साठवून ठेवावी.
९) एक चमचा कारल्याची भुकटी एक कप गरम पाण्यामध्ये टाकावी.
१०) काही मिनिटे ढवळल्यानंतर त्यात आपल्याला आवश्यक गोडी येईपर्यंत एक किंवा दोन चमचे मध टाकावा.
अधिक वाचा: Dragon Fruit : ड्रॅगन फ्रुटपासून कसे बनवाल विविध प्रक्रियायुक्त पदार्थ? वाचा सविस्तर