पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ नोव्हेंबर २०२३ रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदान, भारत मंडपम इथे 'वर्ल्ड फूड इंडिया २०२३' या दुसऱ्या भव्य खाद्य महोत्सवाचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम अन्न उत्पादनात भारताचे जागतिक नेतृत्व प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करत असून योगायोगाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. खाद्य उत्पादनांचा अग्रगण्य उत्पादक आणि ग्राहक या नात्याने वर्ल्ड फूड इंडिया २०२३ च्या माध्यमातून जगाला आपली क्षमता दाखवून देण्याची संधी भारताला मिळाली. ३ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर २०२३ या तीन दिवसांच्या कालावधीत या कार्यक्रमात भारतीय खाद्यपदार्थातील समृद्ध वैविध्य अनुभवण्यासाठी अन्न उत्पादक, पोषक खाद्यपदार्थ उद्योग, प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ कंपन्या, प्रख्यात शेफ आणि जगभरातील खाद्यप्रेमींचे सहभागी झाले होते.
अन्न प्रक्रिया क्षेत्राची वाढ आणि ते उदयोन्मुख क्षेत्र म्हणून कसे पुढे आले आहे यावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत भारताने रू ५०,००० कोटींहून अधिक थेट परकीय गुंतवणुक मिळवली आहे, ज्याचे श्रेय प्रामुख्याने सरकारच्या उद्योगपूरक आणि शेतकरी समर्थक धोरणांसाठीच्या दृढ वचनबद्धतेला आहे. भारताच्या कृषी निर्यातीत प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या वाट्यात १३% वरून २३% पर्यंत लक्षणीय वाढ झाली असून यामुळे प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीत एकूण १५०% वाढ झाली आहे हे विशेषत्वाने नमूद करण्यासारखे आहे. भारत दूध, मसाले आणि कडधान्ये उत्पादनात जगातील आघाडीचा देश म्हणून उदयास आला असल्याचे उद्घाटन सत्रादरम्यान उल्लेखित करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, अन्न प्रक्रिया क्षेत्राने गेल्या दोन वर्षांत ७.२६% नी मजबूत वाढ दर्शवली आहे.
गेल्या नऊ वर्षांत, सरकारच्या भरीव पाठिंब्याने विविध योजना आणि उपक्रमांद्वारे ५६,००० हून अधिक अन्न प्रक्रिया उद्योगांना सक्षम केले आहे, तसेच १.२५ लाखांहून अधिक स्वयं-सहाय्यता गटांना बीज भांडवल उपलब्ध करून दिले आहे. या सरकारी प्रकल्प आणि उपक्रमांमुळे अंदाजे ३२ लाख शेतकऱ्यांना याचे लाभ झाले असून सुमारे ९.७५ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारताच्या कृषी-निर्यात धोरणाची ऐतिहासिक ओळख, व्यापक राष्ट्रव्यापी दळणवळण आणि पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करणे, जिल्ह्यांना जागतिक बाजारपेठांशी अखंडपणे जोडण्यासाठी १०० हून अधिक जिल्हास्तरीय हबची स्थापना, २ वरून २० पर्यंत पोचलेल्या भव्य मेगा फूड पार्कचा उल्लेखनीय विस्तार आणि भारताच्या अन्न प्रक्रिया क्षमतेमध्ये १२ लाख मेट्रिक टनांवरून २०० लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त झालेली अचंबित करणारी वाढ जी गेल्या नऊ वर्षांत प्रभावी १५ वृद्धी दर्शवते यावरही त्यांनी भर दिला.
प्राचीन भारतीय खाद्यपदार्थ आणि पद्धतींचे पुनरुज्जीवन आणि प्रचार जे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि आरोग्याच्या दृष्टीने जागरूक उत्पादने प्रदान करतात हे या कार्यक्रमाचे मुख्य लक्ष्य आहे. या पारंपारिक खाद्यपदार्थांचे मूल्य उत्पादन, उपभोग आणि निर्यात क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. वर्ल्ड फूड इंडियाच्या माध्यमातून भारत सरकार या भारतीय खाद्यपदार्थ आणि खाद्य पद्धतींचा प्रचार, निर्यात आणि पुनरुज्जीवन करण्याची सुवर्णसंधी प्रदान करत आहे.
श्री अन्न: भारताचे सुपरफूड!
श्री अन्न म्हणून ओळखले जाणारे भरड धान्य हे भारतीय आहारात शतकानुशतके अंतर्भूत असलेले महत्वपूर्ण खाद्यान्न आहे. हे उल्लेखनीय सुपरफूड केवळ ग्लूटेन-मुक्त असण्याचे वेगळेपण अंगी बाणवत नाहीत तर ते महत्त्वपूर्ण पोषक तत्वांनी भरलेले आहेत. विविध पर्यावरणीय परिस्थितींशी जुळवून घेण्याच्या क्षमतेसाठी आणि त्यांच्या पर्यावरणास अनुकूल स्वभावासाठी ते ओळखले आणि सेवन केले जातात. भरड धान्य, त्यांच्या विविध स्वरुपात, आपल्यासमोर असलेल्या जागतिक आव्हानांमध्ये अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी , पोषण वाढवण्यासाठी तसेच शाश्वत योगदान देण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. भारताचा भरड धान्य उपक्रम या उल्लेखनीय अन्नाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी तत्पर आहे. तसेच भरड धान्य जगभरात लोकप्रिय आणि निरोगी आहाराचा पर्याय म्हणून उदयास येण्याचा पाया या उपक्रमाच्या माध्यामतून रचला जात आहे.
हे अस्सल प्रतीचे आणि पौष्टिक भारतीय सुपरफूड स्विकारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (श्री अन्न) म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. वर्ल्ड फूड इंडिया २०२३ हे भरड धान्याच्या आवश्यकतेचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. यात विविध पाककृती, उपहार आणि या धान्यांचा समावेश असलेल्या मिष्टान्नांसह विविध प्रकारच्या पाककृतींचा समावेश आहे. आयुष मंत्रालयाने फूड स्ट्रीटच्या माध्यामतून भरड धान्य आधारित खाद्यपदार्थांचे अनुकरणीय प्रदर्शन आयोजित केले आहे. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या डॉ. रुतिका यांनी व्हिटॅमिन ई, लेसिथिन, मेथिओनिन, मॅग्नेशियम आणि लोह यासारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध अशा नाचणीलाडू, अळीव खीर आणि रागी पॉप्स यांसारखे आपल्या एकूण आरोग्यासाठी योगदान देणारे स्वादिष्ट पदार्थ सादर केले आहेत. हिंदुस्तान लेव्हल युनायटेडने श्री अन्नाचे विविध प्रकार असलेले सर्वसमावेशक 'मिलेट इंडिया प्लेटर' देखील सादर केले आहे. या अनोख्या खाद्यपदार्थात ज्वारीचाट, बाजरी थालीपीठ, बाजरी मेथीठेपला आणि भरड धान्य युक्त बनारसीपान यासारख्या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश होता ज्यात या धान्यांच्या वापरातून विविध पाककृती मांडल्या जात आहेत.