Join us

कमी खर्चात तुम्हाला सुरु करता येतील हे ५ लघु प्रक्रीया उद्योग, सरकारचेही मिळेल अनुदान..

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 05, 2024 1:30 PM

शेतीसोबत एखादा चांगलं उत्पन्न देणारा जोड व्यवसाय आता राज्यातील अनेक शेतकरी करू लागले आहेत. अल्पभूधारक, भूमीहीन शेतकरी बहुतांशी डेअरी ...

शेतीसोबत एखादा चांगलं उत्पन्न देणारा जोडव्यवसाय आता राज्यातील अनेक शेतकरी करू लागले आहेत. अल्पभूधारक, भूमीहीन शेतकरी बहुतांशी डेअरी व्यवसाय करतात. कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रक्रीया उद्योगांसह अनेक व्यवसाय शेतकऱ्यांना करता येऊ शकतात. यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून  सुक्ष्म अन्न प्रक्रीया तसेच इतर योजनांमधून अनुदानही मिळते. अनेकांना प्रक्रीयाउद्योगांमधून उत्पन्नाचा चांगला मार्ग गवसला आहे. हे पाच व्यवसाय तुम्हाला करता येतील.

कोरफड ज्यूस

कोरफडाचे आयुर्वेदिक फायदे आणि वाढती मागणी लक्षात घेता कोरफडीपासून ज्यूस बनवण्याचा प्रक्रीया उद्योग कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा ठरू शकतो.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील सुमित राऊत या शेतकऱ्याने कोरफडीचे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. आता त्यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळत असून समृद्धीचा मार्ग गवसला आहे.

काय आहे प्रक्रीया?

  • एलोवेरा ज्यूस बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथम, पिकलेली कोरफडीची पाने घेतली आणि ती चांगली धुतली जाते. 
  • नंतर टोके कापून आतील जेल बाहेर काढण्यासाठी चमचा किंवा चाकू वापर केला जातो. 
  • जेल एका ब्लेंडरमध्ये ठेवले आणि ते गुळगुळीत होईपर्यंत मिश्रण केले जाते. 
  • पुढे, जेलची चव चांगली आणि जास्त काळ टिकण्यासाठी त्यामध्ये पेक्टिनेस, सायट्रिक ऍसिड आणि ऍस्कॉर्बिक ऍसिड मिसळले जाते. 
  • त्यानंतर, रस मिळविण्यासाठी मिश्रण फिल्टर करून ते विक्रीसाठी बाटल्यांमध्ये ठेवले.

पापड उद्योग

राज्यात आता उन्हाळा सुरु झाला आहे. अनेक घरांमध्ये आता तिखट, पापड, कुरडया करण्यासाठी महिलांची लगबग सुरु होईल. पण केवळ उन्हाळी काम म्हणून न बघता याला व्यवसायाचंही स्वरूप देता येऊ शकतं. विशेष म्हणजे असा गृहउद्योग देशातील अनेक महिला करतात. असा व्यवसाय स्थापन करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते.

वर्धा जिल्ह्यातील प्रिया फाले या महिलेने अन्वी पापड या नावाखाली कंपनी स्थापन केली आणि पापड बनवण्यास सुरुवात केली. पापड बनवणं ही तशी सोपी प्रक्रीया. त्यामुळे खर्चही तसा कमीच. सध्या शहरांमध्ये नोकरीमुळे महिलांना घरी उन्हाळी काम करणे शक्य होत नाही. परिणामी तयार पदार्थांना मागणी आहे.

  • पापड बनवणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. पापड बनवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या डाळी जसे की उडीद डाळ, मूग डाळ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रण वापरू शकता. 
  • तुम्ही मागणी नुसार 10, 20 किंवा 40 पापडांच्या पॅकेटमध्ये विकू शकता. मॅन्युअल, सेमी_ऑटोमॅटिक आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक असे पापड उद्योगांचे विविध प्रकार आहेत. 

नाचणी बिस्कीटे

देशात तृणधान्य आणि भरडधान्यांना मोठ्या प्रमणात चालना देण्यात येत असून त्यासाठी वेगवेगळ्या सरकारच्या योजनाही आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या मेदयुक्त पदार्थ टाळण्यासाठी पर्याय म्हणून तृणधान्यांना पसंती दिली जाते. 

शहरी भागातील आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांमध्ये मिललेट्स पासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. कमी भांडवलात व्यवसायाला सुरुवात करता येते. तसेच स्थानिक स्तरावर मार्केट ही लगेच उपलब्ध होते.याशिवाय प्रक्रीया उद्योगांना सरकार अनुदान देत असल्याने कमी खर्चात नाचणी किंवा मिलेटपासून बिस्कीटे बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला फायद्याचा ठरु शकतो.

साताऱ्यातील शुभांगी सोनवले या महिलेने नाचणीच्या बिस्कीटांसह विविध पौष्टीक उत्पादनांचा व्यवसाय सुरु केला आणि त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

नाचणी_बिस्किटांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नाचणी, शुद्ध तूप, लोणी, साखर अथवा गूळ, बेकिंग पावडर, व्हॅणीला पावडर, पॅकेजिंग साहित्य, ईत्यादी कच्चामाल वापरला जातो.

लोणची व्यवसाय

भारतातील लोकांना जेवणात तोंडी लावायला लोणचं लागतंच! आंबटगोड लोणच्यांनी जेवणाची लज्जत वाढतेच पण व्यवसाय म्हणूनही हा कमी खर्चाचा आणि नफा मिळवून देणारा लघूउद्योग आहे.

कैरी, लिंबू, हळद, मिरची अशा विविध पदार्थांपासून लोणची बनवण्याचा व्यवसायही तुम्हाला करता येऊ शकतो.  याशिवाय तयार लोणच्यांना मागणी असल्याने कमी भांडवलात उद्योजक बनु इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली व्यवसायसंधी आहे. अनेक महिला एकत्र येत समुहाने असा व्यवसा आता करू लागल्या आहेत.

नागपूरच्या कोमल ढगे यांनी प्रवाह नावाने लोणच्याचा व्यवसाय सुरु केला.नवीन मशीन खरेदी करण्यासाठी पीएमएफएमईकडून पैसे मिळाल्याने व्यवसाय चांगला झाला.

कैरीचे लोणचे,  लिंबू लोणचे, मिरचीचे लोणचे,  लिंबू-मिरचीचे लोणचे, करंवदे लोणचे, आवळा लोनचे,   हळदी लोणचे, फणस लोणचे, आल्याचे लोणचे असे विविध प्रकारचे लोणचे भारतात लोकांना जेवणासोबत लोणचे खायला खूप आवडते. लोणच्यामुळे जेवणाची चव आणखी छान लागते, त्यामुळे त्यांना मोठी मागणी आहे. ज्वारी रवा उत्पादन

तृणधान्यांपासून विविध उत्पादनांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. ज्वारी, रवा किंवा इडली रवा अशा प्रक्रीया उद्योगांना मोठी मागणी आहे. तृणधान्याची मागणी सर्व थरातील लोकांमध्ये मागणी वाढू लागली आहे.  अहमदनगरच्या सरोजनी फडतरे यांनी समृध्द्धी अॅग्रो ग्रुपच्या माध्यमातून तृणधान्यावरील विविध उत्पादनांचे उत्पादन सुरू केले. यातून त्या आर्थिक सक्षम झाल्या असून त्यांच्या गुड टु ईट या ब्रँडला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रव्यवसायपैसा