Join us

२ एकरात सोयाबीन ओमकार वाणाचे २८ क्विंटल उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 4:00 PM

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील प्रगतशील शेतकरी राजकुमार सोमानी यांनी कृषी संजीवनीचे सोयाबीन ओमकार जातीचे बीबीएफ पद्धतीने लागवड करून ...

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील प्रगतशील शेतकरी राजकुमार सोमानी यांनी कृषी संजीवनीचे सोयाबीन ओमकार जातीचे बीबीएफ पद्धतीने लागवड करून २ एकरात २८ क्विंटल उत्पादन काढले . या कृषी संजीवनी शेत दिनास उपस्थित शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली. ओमकार वाणावर रोगाचा प्रादुर्भाव कमी होता, दाणे भरणीवर त्याचा विपरीत परिणाम झाला नाही. म्हणून प्रतिकूल वर्षात विक्रमी उत्पादन देणारे वाण ठरले.

या कार्यक्रमाकरिता जवळा बाजार परिसरातील 150 शेतकरी व विक्रेते उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना कृषी सल्लागार माधवरावजी धांदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद जवळा बाजार येथील सरपंच श्री. दत्तराव अंभोरे यांनी भूषविले या कार्यक्रमाकरिता अनेक प्रतिष्ठित शेतकरी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्रीधर मालधूरे नागपूर लक्ष्मीकांत पाटील विभागीय विक्री व्यवस्थापक गणेश डुकरे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली व प्रताप जाधव जिल्हा प्रतिनिधी परभणी यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :शेतकरीलागवड, मशागतकाढणी