Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >ॲग्री प्रॉडक्ट्स > Drip Irrigation: चांगल्या मॉन्सूनमुळे ठिबक वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार

Drip Irrigation: चांगल्या मॉन्सूनमुळे ठिबक वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार

Drip Irrigation System: A good monsoon will increase the number of farmers using drip irrigation | Drip Irrigation: चांगल्या मॉन्सूनमुळे ठिबक वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार

Drip Irrigation: चांगल्या मॉन्सूनमुळे ठिबक वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार

Drip irrigation: आगामी तिमाहीत देशात ठिबकच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Drip irrigation: आगामी तिमाहीत देशात ठिबकच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

More farmers will adopt drip irrigation system this year यंदा हवामान खात्याने दिलेला चांगल्या मॉन्सूनचा अंदाज आणि आतापर्यंत देशात अनेक ठिकाणी झालेला चांगला मॉन्सून, या जोडीला केंद्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी, सिंचन क्षेत्र, मायक्रो, स्मॉल व मीडियम एन्टरप्रायजेस आणि कृषी-संबंधित व्यवसायांना मदत/अर्थसहाय्य करण्याची घोषणा केल्याने आगामी काळात महाराष्ट्रासह देशातील ठिबक सिंचन प्रणाली वापरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे कन्सोलिडेटेड आणि स्टँडअलोन आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ जुलै रोजी मुंबई येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे कन्सॉलिडेटेड (एकत्रित) उत्पन्न जवळजवळ १४७८ कोटी रुपये झाले. कर, व्याज व घसारापूर्व नफा (EBITDA-इबीडा) १८०.८ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन (Anil Jain, MD, Jain Irrigation) यांनी सांगितले की ऐतिहासिकदृष्ट्या, पावसाच्या काळात सूक्ष्म सिंचनासाठी व्यवसाय मंदावलेला असतो. तथापि, चांगला मान्सून आणि अलीकडील अर्थसंकल्पात कृषी, सिंचन क्षेत्र, मायक्रो, स्मॉल व मीडियम एन्टरप्रायजेस आणि कृषी-संबंधित व्यवसायांना मदत/अर्थसहाय्य सरकारने केलेल्या घोषणेमुळे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मागणीचे पुनरुज्जीवन होऊन मंदावलेली मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. आम्हाला आमच्या सर्व कार्यक्षेत्रांतील व्यवसायामध्ये चांगल्या व्यवसाय संधींची आशा आहे. या पार्श्वभूमीवर कंपनी शाश्वत वाढ करण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे,” 

“यापूर्वी सांगितल्याप्रमाणे Q1FY25 चा महसूल कमी अपेक्षीत होता आणि त्यामुळे नकारात्मक परिणाम दिसला. मुख्यतः जल जीवन मिशनच्या संस्थात्मक व्यवसायामुळे देशांतर्गत विक्री कमी झाल्यामुळे एकत्रित महसूल (उत्पन्न) सुमारे १३ टक्क्यांनी घटला. धोरणात्मक निर्णयाने ठरल्याप्रमाणे आम्ही प्रकल्प व्यवसाय कमी करत आहोत असेही श्री. जैन यांनी यासंदर्भात माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान काटेकोर सिंचन प्रणाली अर्थात ठिबक सिंचन प्रणालीचा पिकांसाठी वापर करण्याकडे देशातील शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहेत. केळी, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, संत्रा, पेरू यासारख्या फळबागायतदार शेतकऱ्यांचा कल प्रामुख्याने ठिबककडे दिसून येतोच. शिवाय अलीकडच्या काही वर्षात कापूस, कांदा, गहू, मका, ऊस, ज्वारी, भात यासारख्या पिकांसाठीही शेतकरी ठिबकला पसंती देऊ लागले आहेत.

Web Title: Drip Irrigation System: A good monsoon will increase the number of farmers using drip irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.