Join us

कादवाच्या इथेनॉल निर्मितीस प्रारंभ, दोन दिवसांत 59 हजार लिटर इथेनॉल निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 11:42 AM

कादवा सहकारी साखर साखर कारखान्याने या गळीत हंगामात दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले आहे.

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील महत्वाचा कारखाना असलेल्या कादवा सहकारी साखर साखर कारखान्याचे प्रतिकूल परिस्थिती असतानाही या गळीत हंगामात दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तसेच इथेनॉल निर्मितीला सुरुवात होत दोन दिवसात जवळपास 59 हजार 232 लिटर इथेनॉल निर्मिती झाली आहे.

विविध अडचणींवर मात करत अखेर कादवा चे प्रत्यक्ष इथेनॉल निर्मितीस प्रारंभ झाला असून चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते पूजन करण्यात आले. प्रकल्प गत वर्षी सुरू झाला परंतु इथेनॉल निर्मितीची परवानगी नसल्याने प्रारंभी स्पिरीट निर्मिती करण्यात आली या हंगामात इथेनॉल निर्मिती परवानगी मिळाली व पाच लाख लिटर इथेनॉल निर्मिती चा कोटा मिळाला मात्र केंद्र सरकार ने इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याने काम थांबले. परंतु शासनाने बंदी मागे घेतली, परंतु कोटा कमी करत बी.हेव्ही मोलासेसपासून तीन लाख लिटर इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली असून कादवा ने इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. 

दरम्यान दोन दिवसात 59,232 लिटर इथेनॉल निर्मिती होत इथेनॉल निर्मितीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तर 23,65,547 लिटर स्पिरीट निर्मिती झाली आहे. यंदा दुष्काळी स्थितीमुळे ऊस टंचाई तसेच ऊस तोड मजूर टंचाई असल्याने कारखान्यांना गळीत हंगामात विविध अडचणींवर मात करत कादवा ने गाळप चा दोन लाख मेटन चा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच सोमवारी 13.01 टक्के उतारा मिळत 2705 मेटन तर 86 दिवसात एकूण 2,01,674 मेटन उसाचे गाळप झाले असून सरासरी 11.61  % साखर उतारा मिळाला. शिवाय 2,32,800 क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. 

सर्वाधिक एफआरपी मिळण्याची शक्यता

तसेच ऊस तोड कार्यक्रमानुसार ऊस तोडणी सुरू असून जिल्ह्यात कादवाचा साखर उतारा सर्वाधिक असून सर्वाधिक एफआरपी मिळण्याची शक्यता असून ऊस उत्पादकांनी कादवाला ऊस पुरवठा करावा असे आवाहन कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे. यावेळी व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते, संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर आदी सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकसाखर कारखानेऊसशेती