Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >ॲग्री प्रॉडक्ट्स > किण्वित सेंद्रिय खत अर्थात एफ ओ एम ठरतंय शेतकऱ्यांसाठी वरदान वाचा सविस्तर

किण्वित सेंद्रिय खत अर्थात एफ ओ एम ठरतंय शेतकऱ्यांसाठी वरदान वाचा सविस्तर

Fermented Organic Manure i.e. FOM is turning out to be a boon for farmers Read more | किण्वित सेंद्रिय खत अर्थात एफ ओ एम ठरतंय शेतकऱ्यांसाठी वरदान वाचा सविस्तर

किण्वित सेंद्रिय खत अर्थात एफ ओ एम ठरतंय शेतकऱ्यांसाठी वरदान वाचा सविस्तर

Fermented Organic Manure (FOM) आपल्या देशामध्ये रासायनिक खताची निर्मिती व वापर होण्यापूर्वी लेंडी खत, शेणखत, मासळीचे खत, काडीकचरा यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती व घरामध्ये जनावरांची संख्या ही भरपूर होती.

Fermented Organic Manure (FOM) आपल्या देशामध्ये रासायनिक खताची निर्मिती व वापर होण्यापूर्वी लेंडी खत, शेणखत, मासळीचे खत, काडीकचरा यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती व घरामध्ये जनावरांची संख्या ही भरपूर होती.

शेअर :

Join us
Join usNext

आपल्या देशामध्ये रासायनिक खताची निर्मिती व वापर होण्यापूर्वी लेंडी खत, शेणखत, मासळीचे खत, काडीकचरा यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती व घरामध्ये जनावरांची संख्या ही भरपूर होती.

पुढे काळाच्या ओघात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे गुरांची जोपासना पूर्वीसारखी करणे शक्य न झाल्यामुळे गुरांची संख्या कमी झाली, आणि शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर करणे कमी झाले कृषी विद्यापीठांची शिफारस विविध पिकांसाठी सर्वसाधारण दहा ते वीस बैलगाड्या शेणखत बरोबर नत्र, स्फुरद, पालाश यांच्या शिफारसी प्रती एकर असे.

जशी सेंद्रिय खतांची मात्रा शेतीसाठी कमी झाली तसा शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खत वापरावर जास्त भर दिला. हरितक्रांतीनंतर शेतीमध्ये संकरित वाणांचा व रासायनिक खतांचा वापर पिक उत्पादन वाढीसाठी खूप प्रमाणामध्ये वाढला.

त्यामुळे काही काळ त्यांचे उत्पादन वाढत गेले. परंतु पुढे केवळ रासायनिक खताचा वापर वाढवला तरी, तितके उत्पादन येत नसल्यामुळे त्याचे आर्थिक गणित बिघडले. शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर कमी झाल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत गेले.

सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत गेल्यानंतर जमिनीमध्ये पिकांसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची संख्या सुद्धा कमी होत गेली. कालांतराने त्या जमिनीचा उत्पादन क्षमता कमी झाली. जमिनीचे आरोग्य धोक्यात आले.

या बाबींचा विचार करून भारत सरकारने PM program  for restoration, awareness, nourishment  and amelioration of mother earth (PM-PRANAM) ही योजना जमिनीचे आरोग्य व सुपीकता वाढविण्यासाठी राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना अनुदान देऊन पर्यायी खते जसे की सेंद्रिय अथवा जैविक खतांचा वापर वाढावा यासाठी कार्यान्वित करण्यात आली.

कृषी विभागाने यासाठी रासायनिक खत  पुरवठा करणाऱ्या मोठ्या खत कंपन्या जसे की इफको, कृभको, आरसीएफ यांना या खताची विक्री करणे विषयी सूचना  दिल्या. या योजनेअंतर्गत, भारत सरकारने किण्वित सेंद्रिय खत अर्थात एफ ओ एम साठी प्रति टन रुपये पंधराशे इतकी रक्कम बाजार विकास सहकार्यासाठी (MDA) पुरवठादार/उत्पादक यांना देऊ केली.

आता आपण  किण्वित सेंद्रिय खत (FOM) विषयी जाणून घेऊ.
वनस्पती अथवा प्राण्यांचे अवशेष कुजवून anorobic पद्धतीने आंबविल्यानंतर जे खत तयार होते, त्याला किण्वित सेंद्रिय खत असे म्हणतात. आंबवण्याच्या क्रियेमध्ये ईस्ट, लाईम, लॅक्टिक ऍसिड  बॅक्टेरिया आणि या तऱ्हेच्या जवळपास ८० सूक्ष्म जीवांच्या प्रजाती इत्यादी चे मिश्रण केले जाते.

FOM चे विशेष फायदे
१) यामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते.
२) यामुळे जमिनीची सच्छिद्रता वाढते.
मातीशास्त्र व कृषी रसायनशास्त्र कृषी संस्था नैनी तसेच सॅम हिंगिनबोटम तंत्रज्ञान व शास्त्र कृषी विद्यापीठ प्रयागराज ,उत्तर प्रदेश यांनी संयुक्तपणे हिरवा वाटाणा या पिकावर एफ ओ एम आणि माईकोरीयजा यांचा मातीवर होणाऱ्या भौतिक व रासायनिक परिणामांचा अभ्यास करून काही नोंदी नोंदवल्या. त्या पुढीलप्रमाणे: जमिनीची सच्छिद्रता ४४.६८% वरून ५२.८१ टक्क्यापर्यंत वाढली म्हणजेच ७.१९% वाढली व पाणी धारण क्षमता ४३.५२% वरून ४८.५३% म्हणजेच पाच टक्के इतकी वाढली.
३) यामुळे जमिनीतील जिवाणूंची गुणवत्ता व संख्या वाढते. हे जिवाणू जमिनीतील अन्नद्रव्याचे खनिजे मध्ये रूपांतर करून पिकांना जास्तीत जास्त उपलब्ध करून देतात.
४) यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन त्यांची साधी संयुगे तयार होतात, जी पिकांकडून सहजपणे शोषली जातात .त्यामुळे अन्न शोषण क्षमता वाढते.
५) पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते व पीक निरोगी राहते.
६) मिथेन अथवा कार्बन डाय-ऑक्साइड सारखे आरोबिकल वायू टाळले जात असल्यामुळे हे पर्यावरण पूरक आहे.
७) यामुळे रासायनिक खताची मात्रा निश्चितच  कमी करता येते.
८) पीक उत्पादनाचा दर्जा व चव  सुधारते.
९) हे खत १००% सेंद्रिय असल्यामुळे, यातील अन्नद्रव्य ही पिकांच्या गरजेनुसार सोडली जातात. त्यामुळे पिकावर कोणताही ताण येत नाही.
१०) या खत वापरामुळे आपल्या देशाची आयातीत खतावर जाणारी रक्कम कमीत कमी बारा हजार कोटी रुपये वाचवता येऊ शकते. कॉम्प्रेस बायोगॅसमुळे आपल्याला एनर्जी मिळू शकते.
११) यामुळे पिकांची व्यवस्थित वाढ होतेच व त्याबरोबर जमिनीतील कार्बन नत्र गुणोत्तर सुद्धा सुधारते.
१२) पिकांचे उत्पादन वाढते.
१३) शेणखत वापराचे ऐवजी हे खत वापरल्याने मजूर व वाहतुकीचा खर्च वाचतो.
१४) शेण खताचा वापर करताना त्यामधून गवताचे बी शेतात जाऊ शकते या खत वापरामध्ये ही शक्यता अजिबात नाही.

यासंबंधी नेदरलँडमध्ये कृषी उत्पादन करणाऱ्या ॲग्रीटोन या संस्थेचे संचालक अँड्र्यूसिन कॉक त्यांनी पुढील निरीक्षणे नोंदविली आहेत. जिथे फक्त कंपोस्ट खताचा वापर केलेला होता तेथील गवत कापल्यानंतर सहा आठवड्यांनी ६० टक्क्यांनी कमी झालेले दिसले. तर जेथे एफ ओ एम वापरले होते. तेथील वजन फक्त तीन टक्क्यांनी कमी झालेले दिसले.
कार्बन ते नत्र या प्रक्रियेमध्ये गुणोत्तर १०:१ पासून १९:५ असे होऊन पीक वाढीसाठी ते उपयुक्त झाले. हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि सुपीकतेसाठी महत्त्वाचे सूचक आहे.
ॲग्रीटोन आणि फीड इनोवेशन सर्विसेस, वांगनियन यांनी केलेल्या प्रारंभिक स्वतंत्र चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे की, सेंद्रिय कचरा आंबल्याने कार्बन आणि सेंद्रिय पदार्थांचे नुकसान लक्षणीयरीत्या कमी होते, ज्यामुळे पुढील पिकांना अधिक पोषण द्रव्य उपलब्ध होतात.
FOM भारतामध्ये सध्या एक कोटी मेट्रिक टन प्रति वर्ष इतके तयार होते, जे आपल्याला सात कोटी टन इतके, देशात असलेल्या ५७० सयंत्रांमधून तयार करणे शक्य आहे.

एफओएम मधील महत्त्वाचे घटक (प्रमाण)
१) आद्रता वजनानुसार - ३० ते ७०%
२) नत्र स्फुरद पालाश - १.२ % पेक्षा जास्त
३) कमीत कमी सेंद्रिय वजनानुसार - १४%
४) कार्बन नत्र गुणोत्तर जास्तीत जास्त - ३०%
५) पॅथोजीन्स - ०
६) वहनता पेक्षा कमी - ४%
७) सामू - ६.५-८.४

वापरण्याची वेळ आणि प्रमाण
या खताचा वापर रान बांधणीचे वेळी करावा. बेसल डोस म्हणून करावा. ऊस, केळी, हळद आले यासारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांसाठी खताची मात्रा विभागून द्यावी. काही पिकांसाठी या खताच्या मात्रा खालील प्रमाणे 

पिक - वापरण्याचे प्रमाण (किलो प्रति एकर)
द्राक्ष - ८००-१०००
डाळिंब - ८००-१०००
ऊस - १०००-१२००
केळी - १०००-१२००
आले, हळद - १०००-१२००
कांदा, टोमॅटो - ५००-६००
कापूस - ५००-६००

- मुकुंद पाटील
9869069189
- राजेंद्र कदम
9763458276

Web Title: Fermented Organic Manure i.e. FOM is turning out to be a boon for farmers Read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.