Join us

जम्बो फवारणी यंत्र पाहिलंय का? एका तासात होते चार एकर फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 9:43 AM

हे फवारणी यंत्र  किसान प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहे. 

पुणे: पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर पाठीवर पंप घेऊन फवारणी करण्यासाठी मजुरांची अडचण येत असते. या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचा जास्त वेळ जातो आणि कामही कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक जम्बो फवारणी यंत्र सध्या बाजारात आले असून त्याचे प्रात्यक्षिकही पाहण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. हे फवारणी यंत्र  किसान प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, या फवारणी यंत्राद्वारे एका तासात चार ते सव्वाचार एकर क्षेत्रावर फवारणी होऊ शकते. त्याचबरोबर एकाच वेळेस सहाशे लीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता यामध्ये आहे. चार ते सव्वाचार एकर फवारणी करण्यासाठी ३ ते साडेतीन लीटर इंधनाची आवश्यकता असते. त्यामुळे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

यंत्राची वैशिष्ट्ये

  • कमी उंचीच्या पिकांमध्ये फवारणी करता येते
  • एकाच वेळी २० ते २४ फूट अंतर फवारणी करता येते
  • यंत्रामुळे पिकाला हानी पोहचत नाही
  • कमी इंधनामध्ये जास्त क्षेत्रावर फवारणी
  • वेळेची बचत

 

दरम्यान, पुण्यातील मोशी येथील किसान प्रदर्शनामध्ये हे फवारणी यंत्र शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना शेतीतील वेगवेगळे तंत्रज्ञान, प्रयोग, उत्पादने पाहण्याची संधी मिळणार आहे. शेती उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधीसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे