Join us

ऐन उन्हाळ्यात ट्रॅक्टरलाही होऊ शकतो का उष्माघात? अशी घ्या काळजी

By बिभिषण बागल | Published: July 31, 2023 11:00 AM

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट, काकऱ्या घालणे, जमीन भुसभुशीत करणे, जमीन सपाटीकरण, पेरणी करणे, आंतरमशागत करणे, मालाची वाहतूक करणे इ. कामे सुलभरीत्या, दर्जेदारपणे, कमी वेळेत, वेळेवर आणि कमी त्रासात तसेच कमी खर्चात होऊ शकतात. 

आजकाल शेतीच्या कामासाठी बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरचा वापर खूपच वाढला आहे आणि ते योग्यही आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट, काकऱ्या घालणे, जमीन भुसभुशीत करणे, जमीन सपाटीकरण, पेरणी करणे, आंतरमशागत करणे, मालाची वाहतूक करणे इ. कामे सुलभरीत्या, दर्जेदारपणे, कमी वेळेत, वेळेवर आणि कमी त्रासात तसेच कमी खर्चात होऊ शकतात. 

किंबहुना शेती व्यवसायाच्या भरभराटीत ट्रॅक्टरचे स्थान फार महत्वाचे आहे. शेती व्यवसायाला ट्रॅक्टर हे वरदान आहे. हे कृषीयंत्र बैलजोडी सांभाळण्यापेक्षा शेती व्यवसायात सर्व दृष्टीने परवडण्यासारखे आहे.

उन्हाळ्यात जमिनीची मशागत यात प्रामुख्याने नांगरणी तसेच माती भरणे यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर केला जातो. यात आपण कामाच्या वेळा न पाळता ट्रॅक्टरची देखभाल न करता चालवतो ते ट्रॅक्टरच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

ट्रॅक्टरची योग्य प्रकारे काळजी कशी घ्यावी?- ट्रॅक्टर काम झाल्यानंतर ऊन-पाऊस यांपासून सुरक्षित अशा जागी निवाऱ्याला ठेवावा.काम झाल्यानंतर धूळ, चिखल अगर काडीकचरा काढून स्वच्छ करावा. ट्रॅक्टर नेहमी एकहाती असावा.ड्रायव्हर सारखे बदलू नयेत आणि ट्रॅक्टर चालू करण्यापूर्वी काही गोष्टी काळजीपूर्वक करायला हव्यात.अगदी पहिली गोष्ट म्हणजे इंजिनटाकीतले तेल पुरेसे आहे कि नाही ते पाहावे.पंपामधले वंगण/तेल डीप स्टीकच्या सहाय्याने तपासावे. रेडीएटरमधील पाणी कमी झाले असेल तर ते भरावे.एअर क्लीनर स्वच्छ करावा.ट्रान्स्मिशन ऑईल डीपस्टीकच्या सहाय्याने तपासावे. टायरमधला हवेचा दाब योग्य आहे ना याची खात्री करावी. (पुढच्या चाकात ०.८ ते १.९ आणि मागच्या चाकात १,५ ते २.५ केजी सें. मी. असावा.) फॅनबेल्ट तपासावा. ज्या ठिकाणी ग्रीस लागते असे भाग तपासावेत. महत्वाचे नट आणि बोल्ट तपासावेत. बॅटरीमधल्या पाण्याची पातळी योग्य आहे कि नाही ते तपासावे. इ. गोष्टी पाहून खात्री करून मगच किल्ली फिरवून ट्रॅक्टर चालू करावा.

ट्रॅक्टर चालू करताना..ट्रॅक्टर चालू करताना पहिल्यांदा इंधनकॉक चालू करावा. गिअर शिफ्ट लिव्हर आणि पिटीओ लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावा.थ्रोटल लिव्हर तीन चतुर्थांश जागेवर ठेवावी. क्लच दाबून ट्रक्टरची चावी ऑनच्या बाजूने फिरवावी. अशा पद्धतीने ट्रॅक्टर चालू करावा.  

ट्रॅक्टर बंद करताना..ट्रॅक्टर बंद करताना थ्रोटल लिव्हर ओढावी आणि इंजिनची गती कमी करावी.  क्लच पेडल दाबावे.  गिअर शिफ्ट लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावी. मेन स्वीच ऑफच्या बाजूला फिरवावे. 

ट्रॅक्टर चालवताना..गरज असेल तर पार्किंग ब्रेक लावावेत.ट्रॅक्टर चालू असताना अचानक वेगळा आणि साधारण आवाज ऐकू येऊ लागला कि ट्रॅक्टर थांबवून त्याचे कारण शोधावे. जर इंजनातून सतत काळा धूर निघत असेल तर त्यावरचा भर कमी करावा.  ट्रॅक्टर गतीमध्ये असताना त्वरित गिअर बदलू नये. ट्रॅक्टरमागे घेताना औजारे जोडताना आपण दक्षता घ्यावी. ड्राबर पट्टी अगर औजारांवर उभे राहू नये. नेहमी क्लच हळुवार सोडवा. रोडवर चालवताना दोन्ही चाकांना ब्रेक लागतो का नाही ते तपासावे. उतारावरून जाताना नेहमी ट्रॅक्टर गिअरमध्ये असावा. वळणावर ब्रेक दाबताना गती कमी करावी. पुली गतीत असताना बेल्ट लावू अगर काढू नये.मॅन्युअलप्रमाणे ट्रॅक्टरच्या सर्व्हिसिंग करून घ्याव्यात. काही तास कामाचे झाले की सुचनेनुसार फिटरकडून ट्रॅक्टरची देखभाल करून घ्यावी.म्हणजे पुढे भविष्यात एखादा मेजर घोटाळा होत नाही. ट्रॅक्टर यंत्राची आपण जशीन काळजी घेऊ तसा तो आपल्याला साथ देईल. अलीकडे ट्रॅक्टरनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सुधारणा केल्यात. सुविधा निर्माण केल्यात. त्यामुळे ट्रॅक्टरची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते आणि त्यामुळेच देखभालीकडे जास्त लक्ष देण्याची गरज पडते. मॅन्युअलचा अभ्यास करून या महागड्या पण उपयुक्त यंत्राची देखभाल सतत ठेवावी.

इंजि. वैभव. आर. सूर्यवंशीवैज्ञानिक, शेती औजारे आणि अभियांत्रिकीकृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म9730696554

टॅग्स :शेतीपीकपीक व्यवस्थापनशेतकरी