Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >ॲग्री प्रॉडक्ट्स > Lakhpati Didi : लखपती दीदींची शेवगा, कढीपत्ता चटणी झाली फेमस; वाचा सविस्तर

Lakhpati Didi : लखपती दीदींची शेवगा, कढीपत्ता चटणी झाली फेमस; वाचा सविस्तर

Lakhpati Didi : Lakhpati Didi's Shevga, curryleaf leaf chutney became famous; Read in detail | Lakhpati Didi : लखपती दीदींची शेवगा, कढीपत्ता चटणी झाली फेमस; वाचा सविस्तर

Lakhpati Didi : लखपती दीदींची शेवगा, कढीपत्ता चटणी झाली फेमस; वाचा सविस्तर

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ हा सहकाराचा मूळ मंत्र आज महिला बचतगटाच्या माध्यमातून सार्थकी ठरत आहे.

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ हा सहकाराचा मूळ मंत्र आज महिला बचतगटाच्या माध्यमातून सार्थकी ठरत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यमन पुलाटे
बाभळेश्वर : एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ हा सहकाराचा मूळ मंत्र आज महिला बचतगटाच्या माध्यमातून सार्थकी ठरत आहे.

जनसेवा फाउंडेशन लोणीच्या माध्यमातून सुरू झालेल्या बचतगटाच्या चळवळीतून लोणी खुर्द येथील विजया नामदेव शिंदे यांनी आपल्या छंदातून आगळावेगळा व्यवसाय सुरू केला आणि या माध्यमातून त्यांना मोठी कमाई होत आहे.

यातून त्यांनी सोबतच्या महिलांना रोजगारही दिला आहे. विजयाताईनी भाजीपाल्यापासून तयार केलेले विविध पापड, लोणची आणि विशेषतः कढीपत्त्याची चटणी फेमस झाली आहे.

महिला सक्षम झाली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून जनसेवा फाउंडेशनची स्थापना झाली. या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जवळपास ५० ते ६० हजार महिलांचे बचतगटाच्या माध्यमातून संघटन झाले.

विजया नामदेव शिंदे यांनी भालचंद्र महिला बचतगट लोणी खुर्द या नावाने सुरू केला. विजयाताई या पहिल्यापासूनच विविध प्रकारची पापड लोणची चटण्या हे करण्यामध्ये त्यांचा मोठा हातखंडा होता.

हाच व्यवसाय पुढे न्यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रथमच लोणी या ठिकाणी म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त होणाऱ्या स्वयंसिद्ध यात्रा २००२ मध्ये आपला स्टॉल लावला.

या स्टॉलमध्ये त्यांनी विविध प्रकारची पापड त्याचबरोबर टोमॅटो, पालक मेथी, बटाटा, मूग, उडीद, मका, तांदूळ आदींपासून तयार केलेली पापड आणि विविध प्रकारच्या चटण्या आणि शेवग्याची फुले आणि पानांची चटणी विक्रीसाठी ठेवली.

लखपती दीदी
शिंदे यांना शेतकरी मेळाव्यामध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये लखपती दीदी हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.

माझ्या परिवाराला लोणची, पापड आवडतात. यातून प्रेरणा घेत मी गृहिणी ते उद्योजक होऊ शकते. हा आत्मविश्वास केवळ बचतगटामुळे मिळाला. - विजया शिंदे

अधिक वाचा: Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर

Web Title: Lakhpati Didi : Lakhpati Didi's Shevga, curryleaf leaf chutney became famous; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.